पुण्यातील कल्याणीनगर येथील हयाटतर्फे नुकताच एक सीएसआर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम हयाट आणि पॅराप्लेजिक रिहॅबिलीटेशन सेंटर पुणे या दोन्ही संस्थातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये युद्धात दिव्यंगत्व आलेल्या सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात सैनिकांच्या अदम्य इच्छाशक्तीचे आणि क्षमतांचे दर्शन घडले. पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रातर्फे सैनिकांसाठी बास्केटबॉलचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ज्या सैनिकांनी युद्धात आपली चालण्याची शक्ती देखील गमावली होती, त्यांनी या खेळात अमर्यादित उत्साह आणि क्षमता दाखवत तेथे उपस्थित अन्य नागरिकांना प्रेरित केले. आदरातिथ्य करण्यात अग्रगण्य असलेल्या हयाटने नेहमीच हयाटशी जोडलेल्या लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
बहादुर सैनिकांना कल्याणीनगर पुणे हयाटतर्फे मानवंदना
Team TNV December 8th, 2017 Posted In: Pune Express
Team TNVपुणे –
या कार्यक्रमाविषयी माहिती देताना कल्याणीनगर येथील हयाटचे महाप्रबंधक सुमित कुमार यांनी सांगितले की, “कुणाकडून तरी प्रेरणा घेणे हे नक्कीच चांगले असते, मात्र कुणालातरी प्रेरित करण्याची भावना शब्दात मांडता येणार नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देशासाठी झटणाऱ्या, आपल्या प्राणांचीही काळजी न करणाऱ्या सैनिकांना परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या प्रयत्नांनंतर त्यांच्या चेहऱ्यावर येणारे स्मितहास्य आमच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.
या कार्यक्रमात सैनिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणण्यासाठी तसेच आनंदासाठी हयाततर्फे केक मिक्सिंग कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना क्रिसमसमध्ये नक्कीच मिळेल, ज्यावेळी त्यांनी मेहनतीने तयार केलेल्या केकच्या बॅटरचा स्वादिष्ट केक त्यांना पुनर्वसन केंद्रात खायला मिळेल, अशी माहिती हयाटच्या समूहातर्फे देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सैनिकांनी स्वादिष्ट बिर्यानी आणि डेझर्टचा आस्वाद घेतला.