पुणे – पर्यावरणावर आधारित ग्रीन थिएटर फेस्टिव्हलमधील एकांकिका स्पर्धेत रमणबाग प्रशालेने प्रथम पारितोषिक पटकाविले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अहिल्यादेवी प्रशालेने तर, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सिटी प्राईट स्कूलने पटकाविले. स्वच्छ शहर सुंदर शहर…पाण्याचे नियोजन काळाची गरज…शहरीकरण शाप की वरदान.. वृक्षारोपण व वृक्षसंगोपन…घनकचरा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन अशा विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करीत शालेय विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स, जय नाटक कंपनी आणि उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक सभागृह येथे पार पडली. पारितोषिक वितरणप्रसंगी पुणे रेल्वे पोलीसचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, टाटा मोटर्सचे उपमहाव्यवस्थापक सुहास कुलकर्णी, लेखक/दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ, उद्योजक समीर समेळ, पर्यावरण विषयी काम करणारे कैलास नरवडे, परेश पिंपळे, विश्वनाथ जोशी, जतीन इनामदार आदी उपस्थित होते. पुणे शहरांतील विविध शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. आबा शिंदे, अनघा वैद्य, नितीन सुपेकर यांनी अंतिम फेरीच्या स्पर्धेचे परिक्षण केले.
सुहास कुलकर्णी म्हणाले, पर्यावरण हा विषय घेऊन सादर केलेली सगळी नाटके अतिशय उत्कृष्ट आहेत. सध्याच्या पिढीमध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक वातावरण तयार होत आहे ही चांगली गोष्ट आहे. अशा उपक्रमांमधून पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण होईल अशी आशा वाटते. पुंडलिक धुमाळ म्हणाले, पर्यावरणविषयक नाटकांचा सराव करीत असताना किंवा ती सादर करताना विद्याथर््यांना पर्यावरण रक्षणाचे गांभिर्य लक्षात येते. पर्यावरणाची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे याची देखील जाणीव विद्याथर््यांना यामधून झाली असणार आहे.
पर्यावरण मित्र शाळा विभागात सिटीप्राईड हायस्कूलने प्रथम, अहिल्यादेवी हायस्कूलने द्वितीय, सावित्रीबाई फुले न्यू इंग्लिश स्कूल शिरवळ व ज्ञानप्रबोधिनी शाळेने चतुर्थ क्रमांक पटकाविला. यासोबतच उत्कृष्ट दिग्दर्शन वैशाली सैदाणे, सुजाता गुंजाळ (प्रथम), रेवती घोगरे (द्वितीय) आणि प्रीतम पिसरेकर (तृतीय) यांना तृतीय क्रमांक मिळाला. लेखन विभागातील प्रथम क्रमांक साहिल ठुसे, द्वितीय क्रमांक प्रज्ञा वैद्य आणि अनिता खैरनार यांना तृतीय क्रमांक मिळाला. सर्वोकृष्ट एकांकिका रुपये २५ हजार, द्वितीय क्रमांक २० हजार, तृतीय क्रमांक १५ हजार आणि चषक, प्रमाणपत्र अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली. याशिवाय सर्वोकृष्ट अभिनेता, अभिनेत्री यांकरीता रोख स्वरुपातील पारितोषिके देण्यात आली. संदीप विश्वासराव यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश पोटफोडे यांनी आभार मानले.