डॉ बाळकृष्ण दामले यांच्या ‘लर्निंग डिझाईन ऑफ ई -कन्टेन्ट ‘ प्रकल्पाची अमेरिकन कॉन्स्युलेटकडून निवड

December 13th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एज्युकेशन मल्टिमीडिया रिसर्च सेंटर (ईएमआरसी )चे प्राध्यापक डॉ बाळकृष्ण दामले यांच्या  ‘लर्निंग डिझाईन ऑफ ई -कन्टेन्ट ‘ या प्रकल्पाची युनायटेड स्टेट्स कॉन्स्युलेटकडून निवड झाली आहे . 

 
युनायटेड स्टेट्स कॉन्सुलेट च्या ‘एक्स्चेंज एम्बॅसेडर प्रोग्रॅम ‘ अंतर्गत ही निवड झाली आहे . त्यानुसार डॉ दामले  हे भारतातील महाविद्यालये ,विद्यापीठातील प्राद्यापक ,शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापनात दृक -श्राव्य माध्यमांच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन करतील .भारतात विविध ठिकाणी याबाबत प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे . 
 
डॉ दामले हे फुलब्राईट स्कॉलर असून ई -कन्टेन्ट निर्मितीसाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत ४ वेळा राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत . ‘अध्यापनात नाट्य आणि चित्रफितींचा वापर ‘ या संशोधन निबंधाला हार्वर्ड युनिव्हर्सिटीने गौरविले आहे 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions