कथाकथनातून उलगडले कचरा समस्येचे गांभीर्य

December 13th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

 
         
पुणे –  कचरा समस्या हा शहरातील अतिशय गंभीर प्रश्न झाला आहे. पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा अनेक गोष्टी आपल्याकडून घडत असतात. रस्त्यावर टाकलेला एखादा कागदाचा कपटा देखील कचरा वाढवू शकतो हे आपल्या लक्षातच येत नाही. स्वच्छतेच्या छोट्या-छोट्या गोष्टींचे पालन केले तरी कचºयासंदर्भात अनेक प्रश्न सुटतील. शहराला पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी कचºयाचे योग्य व्यवस्थापन होणे अतिशय गरजेचे आहे. शहरातील या अतिशय गंभीर बनत असलेल्या कचरा समस्येचे गांभीर्य कथाकथन,नृत्य आणि परिसंवादातून उलगडले.
 
सूत्रधारतर्फे भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी कचरा समस्येविषयी टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया येथे करण्यात आले होते. सूत्रधारच्या  मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला, उत्कर्षा दगडे,वैष्णवी निंबाळकर  यांनी कचरा समस्या आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नृत्यातून उलगडले सांगितले.  टॉक शो अंतर्गत अनुजा पित्रे, वरुण मुखर्जी आणि अनिरुध्द प्रसाद यांची मुलाखत घेण्यात आली. 
 
अनुजा पित्रे म्हणाल्या, समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूला कच-याचा प्रश्न खूप मोठा आहे, असे लक्षात आले. यासाठी एकत्र काम करण्याचा विचार करून आम्ही वेगवेगळ्या विषयांशी निगडीत असलेले तिघेजण एकत्र आलो. बाजारातून आपण प्लॅस्टिकच्या पाण्याचा बाटल्या विकत घेतो. त्या बाटल्यांवर जी एक्सपायरी डेट असते ती त्या बाटलीसाठी असते. अनेकजण अशा बाटल्यांमध्ये पुन्हा पाणी भरून त्या वापरतात. अशा बाटलीतून पाणी प्यायल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होतीलच परंतु पर्यावरणाला देखील मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचते.   
 
अनिरुध्द प्रसाद म्हणाले, दैनंदिन जीवनात एका घरामधून किती कचरा तयार होतो हे आपल्या लक्षात येत नाही. अनेक घरांमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा एकत्रच टाकला जातो. परंतु सफाई कर्मचा-यांना असा कचरा वेगळा करण्यासाठी किती त्रास होत असेल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण हे कर्मचारी फक्त एका घरातील कचरा वेगळा करीत नाहीत तर ते संपूर्ण शहराचा कचरा वेगळा करीत असतात. त्यामुळे घरातील व्यक्तींनी घरच्या घरी कचरा वेगळा केल्यास कर्मचा-यांना देखील त्रास होणार नाही आणि या कच-याचे विघटन देखील व्यवस्थित करता येईल. 
 
वरुण मुखर्जी म्हणाले, सोसायटीमधील प्रत्येकाने कच-याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करायला पाहिजे हे शिकणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही प्रशिक्षण कार्यशाळेचे देखील आयोजन करतो. प्रत्येकाने घरातील कचरा वेगळा करणे ही आपली जबाबदारी आहे, असे समजून तो ओला, सुका कचरा वेगवेगळा केल्यास कच-याचा प्रश्न नक्कीच सुटेल. 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions