पुणे – ’एसएई इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, जॉन डियर, अल्टिर आणि आणि व्हिजीए डिजीटल प्रिंटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याच्या अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेे.
रविवार, दि. 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी झालेल्या या स्पर्धेत 25 शाळांच्या 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार,बस,अॅम्ब्युलन्स विविध मॉडेल्स तयार केली.कोणत्याही इंधनाशिवाय केवळ हवेवर ही मॉडेल्स चालविण्यात आली आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांनी वाहननिर्मितीमागचे विज्ञान समजावून घेतले.
स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’ एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल (रहाटणी,) येथे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पार पडली.
उद्गाटनप्रसंगी विनय दामोदरे,गजेंद्र जगताप(इटन इंडिया लि.),रमेश पसरिचा(एसएई इंडिया),डॉ.व्ही ए पंखावाला ,नरहरी वाघ(एआरएआय )डॉ.के.सी.व्होरा(एसएई इंडिया ) ,अभिजीत वर्हाडे(जॉन डीअर) ,राहित सदलगे(अल्टेयर) हे मान्यवर उपस्थित होते.
इटॉन , जॉन डियरआणि एआरएआयसारख्या कंपन्यांतील 130 पेक्षा जास्त स्वयंसेवक दरवर्षी 25 पेक्षा जास्त शाळांना आणि 200 पुण्यातील विद्यार्थ्यांना स्टीम आणि नेक्ट जनेरेशन सायन्स या माध्यमातून वाहननिर्मिती मागचे विज्ञान समजावून देण्यासाठी ,मनोरंजनासाठी आणि खेळण्यासाठी मदत करत आहेत.
देशातील ऑटोमोबाईल अभियंत्यांची गरज वाढत असून, या क्षेत्रात कारकीर्द करण्याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील मूलतत्त्वे छोटी मॉडेल्स तयार करून शिकणे हा अ वर्ल्ड इन मोशन उपक्रमाचा उद्देश आहे. या स्पर्धांमधून देशाचे भावी इंजिनियर्स घडणार आहेत.
अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’ मधील विजेता भारतातील इतर 35 शहरातील विजेत्यांसह 10 व्या राष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेणार आहे. ही स्पर्धा जानेवारी 2018 मध्ये पुणे येथे कमिन्स, बालेवाडी येथे होणार आहे. अशी माहिती माहिती डॉ. के. सी. व्होरा (उपाध्यक्ष, एसएई इंडिया) यांनी दिली.