पुणे – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी आझम कॅम्पस येथे झाला .
राज्यभरातून ९५ शाळातून १८० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले . उर्दू आणि इंग्रजी भाषेतून झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांना एकूण १
लाखाची पारितोषिके देण्यात आली . खा . मौलाना असरूल हक काझमी(सदस्य ,मजलिस -इ -शूरा ,दारुल उलूम देवबंद ) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले . कार्यक्रमाच्या अध्य्क्षस्थानी डॉ . पी ए इनामदार हे होते . कार्यक्रमाला आबेदा इनामदार ,लतीफ मगदूम ,मुनवर पीरभॉय ,नासिर खान उपस्थित होते .
आझम कॅम्पस येथे २२ आणि २३ डिसेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या . पाचवी ते सातवी ,आठवी ते दहावी ,अकरावी ते बारावी ,पदवी आणि पदव्युत्तर अशा गटात या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या . स्पर्धेचे हे चवथे वर्ष आहे .
इस्लामच्या शांततेच्या ,मानवतेच्या संदेशावर आझम कॅम्पसची वाटचाल चालू आहे .आधुनिक शिक्षण ,तंत्रज्ञान समाजातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचे मोठे काम डॉ पी ए इनामदार यांनी केले आहे ‘अशा शब्दात खा . मौलाना असरूल हक काझमी यांनी या उपक्रमाचा गौरव केला .
‘भारतात मुस्लिमांची प्रगती जगातील अन्य देशांपेक्षा चांगली आहे ,अधिक प्रगती करण्यासाठी अधिक कष्ट करायला तरणोपाय नाही ,त्यासाठी नव्या पिढीला स्पर्धेसाठी सज्ज करण्याचे काम आझम कॅम्पस करीत आहे ‘असे उद्गार अध्य्क्षस्थानावरून बोलताना डॉ . पी ए इनामदार यांनी केले .
—