शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नेताजी चव्हाण यांचे निधन

December 26th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – शिवसेनेचे माजी शहर प्रमुख आणि माजी विरोधी पक्ष नेते नेताजी गणपतराव चव्हाण (वय-57) यांचे दीर्घ आजाराने मोहननगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
नेताजी चव्हाण यांनी सन 1992 व 1997 असे दोनदा नगरसेवक पद भूषवले तसेच गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक, मोहनगर येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते.
चव्हाण यांच्या पार्थीवावर त्यांच्या मुळगावी मु.पोस्ट बोरवडे ता.कागल जि. कोल्हापूर येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मोहननगर शिवसेना शाखा येथे ठेवण्यात आले होते यावेळी स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे, मीनल यादव, माजी नगरसेवक मधुकर बाबर, मारुती भापकर, नंदकुमार सातुर्डेकर, योगेश बाबर, गणेश लंगोटे, सारंग कामतेकर, अमित बाबर, आदींनी श्रद्धांजली वाहिली

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions