पुणे – भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेणाऱ्या आणि विकसित जगाचे चित्र रंगविणार्या विएलएसआय डिझाईन आंतरराष्टीय परिषदेचे उद्घाटन आज पुण्यात झाले.
उदयोग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा प्रतिसाद लाभलेल्या या परिषदेचे उद्घाटन सिगेट कंपनीचे मार्क रे यांनी केलेल्या भाषणाने झाले. क्वालकॉम कंपनीचे सच्चिदानंद वरदराजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भविष्यात मानवी बुध्दिमत्तेची कामे मोबाइल फोनच्या साहाय्याने वेगाने होतील. त्या साठी मोबाइलला तसे प्रशिक्षण दिले जाईल. मानवी बुद्धी प्रमाणे समज, तर्क, क्रिया यावर आधारित सेंसर, संगणकीय भाषा याच्या वापरातून हे शक्य होईल.
मानवी बुद्धी च्या गुंतागुंतीच्या क्रिया क्लाउड कंम्प्यूटरवर करण्यात येतील तर मोबाइल वर अपेक्षित काम केले जाईल. हे साध्य करताना सुरक्षितता, खात्री, याचा विचार केला जाईल. हे करताना हाड॔वेअर आणि साॅफ्टवेअर जितके दर्जेदार तितके चांगले. आपल्या लाडक्या मोबाईलच्या माध्यमातून स्मार्ट जगाची संकल्पना साकारली जाणार आहे. स्मार्ट होम, स्मार्ट सिटी, दळणवळण, आरोग्य, संपर्क या सर्वांच्या केंद्र स्थानी मोबाइलच असेल. कृञिम बुद्धिमत्तेच्या वापरातून मोबाइल वापराचा परिघ रूंदावणार आहे. खर्या अर्थाने तो आपला मित्र होणार आहे.
अतिउच्च तंञज्ञानाचे केंद्र म्हणून विकसित होणाऱ्या पुण्यात या क्षेत्रातील वाढीस चालना मिळेल, असे निरंजन पोळ यांनी सांगितले. या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योग व विद्यार्थी याच्यासाठी ही परिषद उत्तम व्यासपीठ ठरेल असे ते म्हणाले.
या क्षेत्रातील उद्योग सिगेट, जाॅन डैर, इंटेल, एटेन यांच्या प्रदर्शनातील स्टॉलवर नवीन तंत्रज्ञान पाहण्यास गर्दी झाली होती. रोबोटिक्स, ड्रायव्हर रहित कार, या क्षेत्रातील सुरक्षाप्रणालीचा उहापोहही होणार आहे. आय आयटी , तसेच जगभरातील नामवंत विद्यापीठांचा या परिषदेत सहभाग आहे.