पुणे – राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती व सोशल रिस्पॉन्सिबीलीटी समूहाच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार, विवेकानंद युवारत्न पुरस्कार आणि जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वनराई संस्थेचे मुकुंद शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत नवी पेठेतील पत्रकार भवन येथे होणार आहे.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री सल्लागार – महाराष्ट्र राज्य श्वेता शालिनी, पुणे विभागाचे माजी उपायुक्त शाम देशपांडे, पुणे मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष पोपटराव ओस्तवाल, टि.म.वि पुणेच्या समाजकार्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रकाश यादव, महाराष्ट्र राज्य समितीचे सी एस आर सदस्य प्रदिप तुपे, ससून पुणेचे समाजकार्य अधिक्षक सत्यवान सुरवसे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे मार्गदर्शक शेखर मुंदडा, सोशल रिस्पॉसिबीलिटीचे अध्यक्ष विजय वरूडकर आदी उपस्थित राहणार आहेत.
विवेकानंद युवा रत्न पुरस्काराने राहुल पाटील, गणेश बाकले, वैभव मोगरेकर, प्रशांत खांडे, सुरज पोळ, रत्नाकर कोष्टी, अमोल उंबरजे, विजय दरेकर, संदीप फुके, राज देशमुख,शशिकांत काटे या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. तर, जिजाऊ पुरस्काराने प्रिती काळे, डॉ. मनीषा दानाने, वसुधा देशपांडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. रमेश अग्रवाल, उमेश दुगाणी, डॉ. आशिष पोलकडे, अॅड. कान्होपात्रा गायकवाड, नारायण फड, जगदीश गजऋषी, विशाल वरुडकर, अॅड. सुषमा यादव, ज्योत्स्ना वरुडकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.