– अर्थतज्ञ चंद्रहास देशपांडे यांचे मत
– उदारीकरणानंतर औद्योगिक आणि आर्थिक विकासावर व्याख्यान
– ट्रीनीटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयातील उपक्रम
पुणे – ‘तंञज्ञान तळागापर्यंत पोहचवून सर्वांचेच आयुष्यमान उंचावत नाही तोपर्यंत जागतिक सत्ता होता येणार नाही’, असे प्रतिपादन अर्थतज्ञ चंद्र्हास देशपांडे यांनी केले. ट्रीनीटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयात नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर उदारीकरणानंतर औद्योगिक आणि आर्थिक विकास या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी मनूष्यबळ तज्ञ अजय बक्षी, मनोज मेहता, प्रसनजीत फडणवीस, केजे शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका विभावरी जाधव, कार्यकारी संचालक हेमंत अभ्यंकर, आणि व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयाचे संचालक डॉ. मंगेश कश्यप, आदि उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले की, देशामध्ये आर्थिक विकास केल्याशिवाय दारिद्रय निर्मूलन शक्य होणार नाही. लोकशाही प्रक्रियेत राहून देशाने केलेला विकास नाकारता येणार नाही. पण आपल्याला अजून बरच काही करता आले असते. यापुढे आपल्याला विकास करण्यासाठी सध्याच्या स्पर्धात्मक काळात प्रभावी काम करावे लागेल. तंञज्ञान सर्व घटकांपर्यंत पोहचवून त्यांचे आयुष्यमान उंचवावे लागेल.
अजय बक्षी म्हणाले की, नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर या चांगल्या संकल्पना आहेत. माञ, अपूरी माहितीमुळे गोंधळ निर्माण झाला. असे असले तरी देश सकारात्मक दिशेने प्रगती करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मनोज मेहता म्हणाले की, नोटबंदीनंतर कर दात्यांची संख्या वाढली असून, त्याद्वारे मिळालेल्या निधीतून मूलभूत सुविधांचा विकास करणे शक्य होईल.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि तज्ञांचे 25 शोधनिबंध असेलले टीआयएमआर ऑब्जर्व्हर ही पुस्तीका प्रकाशित करण्यात आली.