पुणे – आदिवासी भागात उद्योजक निर्मिती आणि स्वयंरोजगारची संधी उपलब्ध करण्यासाठी, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन बोरलॉग इंस्टीट्यूट फॉर एशिया (बिसा) नवी दिल्ली व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे पुणे जिल्हयातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील ५० बेरोजगार आदिवासी युवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. हे प्रशिक्षाण मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, खडकी पुणे येथे दिले जात आहे. या प्रशिक्षणात कुकुक्ट पालनाचे महत्व, अंडी उबवणी, अंडयासाठी व मासांसाठी कुक्कुटपालनाच्या पध्दती, परसातील कुक्कुटपालन, प्रकल्प तयार करणे, सरकारी योजना, विपणन आणि संबंधित समस्यांवर पशुसंवर्धन विभागातील अधिकारी सविस्तर माहिती देणार आहेत
हवामान संपुरक खेडी प्रकल्पांतर्गत बोरलॉग इंस्टीट्यूट फॉर एशिया (बिसा) नवी दिल्ली, द्वारा आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील २५० दारिद्य रेषेखाली आदिवासी महिलांना पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देऊन १ महिन्यांची २५ उत्कृष्ट जातीची पिल्ले, खुराडयासाठी जाळी, पाण्याचे भांडें व खाद्याचे भांडे मोफत दिले जाईल
आदिवासी भागात स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करणे, शेतीला जोडधंदा देवून शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्यात मदत करणे , अन्न आणि पोषण सुरक्षा साध्य करण्ये आणि आदिवासी महिलांचे आर्थिक आणि बौध्दिक सक्षमीकरण करणे हि या कार्यक्रमाची उद्दीष्टे आहेत.