– आदर पूनावाला आणि हुकम चांद शर्मा डी. लिटने सन्मानित
पुणे – विद्यार्थ्यांचा जल्लोष, पालकांचे गर्वाने पाणवलेले डोळे आणि टाळ्यांच्या गजरात डी. वाय. पाटीलचा दुसरा दीक्षान्त समारोह पार पडला. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून आवर्जाने उपस्थित होत्या. तसेच सोहळ्याला डॉ. डी वाय पाटील (बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल), डॉ. विजय पाटील (कुलपती, डी. वाय. पाटील विद्यापीठ) व डॉ. अजिंक्य डी वाय पाटील (अध्यक्ष, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ) ह्यांची उपस्थिती लाभली . आदर पूनावाला(सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि हुकम चांद शर्मा (कायदेशीर लिमिक) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते डी. लिटने सन्मानित करण्यात आले. ह्या विलक्षण क्षणाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ही संध्याकाळ म्हणजे निव्वळ गुणवत्ता आणि यश याचे एक उत्तम प्रतिक होती.
अजिंक्य डी वाय पाटीलच्या दुसऱ्या दीक्षांत सामारोचा मी एक भाग असून हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे असे मी समजते अशी भावना माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्यांनी आपल्या भाषणात व्यक्तकेली. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्तम बदल घडवून आणण्याचे ध्येय ह्या विद्यापीठाने फार अल्प कालावधीत साध्य केले हे अतिशय कौतुकास्पद आहे असेही त्या म्हणाल्या.
डॉ. अजिंक्य पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले. ह्यावेळी बोलताना त्यांनी आपले विद्यापीठाचे असलेले ध्येय आणि त्यामागचा त्यांचा विचार आणि दृष्टीकोन देखील बोलून दाखविला. हा सोहळा म्हणजे फॅकल्टी आणि विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव आहे असे ते आपल्या भाषणात बोलले. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या आपल्यासोबत असून ही एक भाग्याची बाब आहे. हे सर्व श्रेय आपले सर्वस्व मानणाऱ्या आणि अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या फॅकल्टी मेम्बर्सना जाते. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना दैनंदिक आव्हानांना, वाढत्या संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वावलंबी बनविण्याचे ध्येय असून त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी करावे हा आमचा उद्देश आहे. शिक्षणाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना देशाचा एक उत्तम नागरिक बनविणे ह्यावर आमचा विशेष भर आहे. भविष्यात काही करू पाहणाऱ्या आणि विशेषतः व्यवसायात कल असणार्यांसाठी आमचे विद्यापीठ अतिशय चोख काम करते आहे.अवघ्या २ वर्षातच विद्यापीठाची इतकी वाढ झाली असून आमचे सुमारे ५० उत्तम कोर्सेस आहेत.