पुणे – कलात्मक रचना, उत्कृष्ठ सादरीकरण आणि नीट नेटकेपणा या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रत्येक वास्तुविशारद यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन अमिटी स्कुल ऑफ आर्किटेक्ट प्लॅनिंगचे संचालक प्रा. अभिजीत शिरोडकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन या महाविद्यालयात ‘मृण्मय – द सिड’ या वार्षिक उत्सवाचे उद्घाटन प्रा. शिरोडकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र सोनवणे, प्रा. गुरुदिप चिखलकर, प्रा. रुजुता पाठक, प्रा. अजय हराळे, ज्येष्ठ अभियंता दत्तात्रय कड, प्रा. स्वाती गोडबोले आदी उपस्थित होते.
प्रा. शिरोडकर म्हणाले की, ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाला अर्थ असतो त्याप्रमाणे वास्तुविशारदाने काढलेल्या प्रत्येक रेषेला महत्व असते. ‘नॅनो’ तंत्रज्ञानाचा युगात कमीत कमी जागेत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देणे हे वास्तुविशारदाचे कौशल्य असते. त्याच्या भौमितीय ज्ञाना बरोबरच रंगांच्या विविध छटांचा वापर करुन कलात्मकता जपावी यातूनच अभिनव कलाकृतीची निर्मिती होईल. तंत्रज्ञान विकसित नसतानाच्या काळात देखील भारतात अनेक अजरामर एैतिहासिक वास्तू उभारण्यात आल्या आहेत त्या वास्तूंचा चिकित्सक पणे अभ्यास करावा व आपले अनुभव विश्व विकसित करावे असेही प्रा. शिरोडकर म्हणाले. यावेळी प्रा. शिरोडकर यांच्या हस्ते ‘अेआयसीए’ (AICA-Appreciation for Innovative and Creative Approach) या स्मरकेचे प्रकाशन करण्यात आले.
काझी म्हणाले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांना उत्तमोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळ करत असते. हि संस्था फक्त विद्यार्थी घडवत नाही तर देशाचा जबाबदार नागरीक घडविण्याचे काम येथील प्राध्यापक करतात.
प्रास्ताविक गुरुदिप चिखलीकर, स्वागत प्राचार्य महेंद्र सोनवणे, सुत्रसंचालन प्रणाली भांबुरे, लिखिता मधुमतला आणि आभार प्रा. चित्रा श्रीवास्तव यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनास पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांनी मार्गदर्शन केले.