पुणे –
पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी पुणे शहरातील वाहतुक व्यवस्थेत बद्दल करण्यात आले आहेत. कोंढवा वाहतूक विभाग पुणे अंतर्गत ईस्कॉन मंदिराचे कमानीपासून खडीमशिन चौकाकडे जाताना 100 मीटर व ईस्कॉन मदिराचे कमानीपासून कात्रजकडे जाताना 50 मीटर सर्व वाहनांना नो पार्किंग व नो हॉल्टींग करण्यात येत आहे, कात्रज कोंढवा रोडवरील जय गणेश प्लाझा इमारती समोर दुचाकी वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात आली आहे, जय गणेश प्लाझा इमारतीचे गेटपासून खडीमशिनकडे जाताना 100 मीटर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग व नो हॉल्टींग करण्यात आले आहे, कोंढवा वाहतूक विभाग पुणे अंतर्गत नफिस अपार्टमेंट ते एस.के मंजिल अपार्टमेंट पर्यंत रोडचे दोन्ही बाजूस सुमारे 150 मीटर नो-पार्कींग व रोलींग मेडोज सोसायटी ते नफिस समोर पर्यंत रोडचे दोन्ही बाजूस सुमारे 150 मीटर नो-पार्किंग करण्यात आले आहे, कोंढवा वाहतूक विभाग पुणे अंतर्गत शत्रुंजय मंदिर चौकामधील टिळेकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीस दोन्ही बाजूस 100 मीटर नो पार्किंग व नो हॉल्टींग करण्यात आली आहे, असे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपा-आयुक्त अशोक मोराळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.