पुणे – राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी 2018 रोजी साजरा करण्यात येणार असून 209, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातर्फे छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम 2017 हा दि. 3 ऑक्टोबर 2017 ते 15 डिसेंबर 2017 पर्यंत राबविण्यात आला आहे. त्यानिमित्त 209 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या कायक्षेत्रात येणाऱ्या मतदारांना तेथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांच्यामार्फत मतदान ओळखपत्र वाटपाबाबत आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी आपले मतदार संघामध्ये शिल्लक असलेल्या व नव्याने प्राप्त झालेल्या मतदार ओळखपत्रांचे 100 टक्के वाटप करण्यात येणार आहे.
छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमामध्ये नविन नांव नोंदणीकरीता समाविष्ट करण्यात आलेले नमुना क्र.6 ज्या मतदारांनी भरलेला आहे. त्या नविन मतदारांनी आपले नजिकचे मतदान केंद्रावर दि.25 जानेवारी 2018 रोजी जाऊन आपले मतदान ओळखपत्र घेण्यात यावे, नविन मतदारांनी मतदान ओळखपत्र ताब्यात घेताना स्वत: हजर राहावे, तसेच नविन मतदारांनी मतदान ओळखपत्र ताब्यात घेण्याकरीता स्वत:चे ओळखपत्र उदा.आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा बँक पासबूक इ. जवळ ठेवावे, नविन मतदारांनी http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपले नांव मतदार यादीत अपलोड असल्याची खात्री करावी, असे 2019 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.