जयहिंदचे नवीन मेवार मेन्स एथिनीक वेअर स्टोअर आता बाजीराव रोडवरती
पुणे – 1980 पासूनच्या गुणवत्तापूर्ण कपडे व राजेशाही समृद्धीचा एक वारसा पुढे न्हेत जयहिंदने आता पुण्यातील बाजीराव रोडवर आणखी एक नवे दालन उघडले आहे. मेवारने मेन्स एथिनीक वेअर स्टोअर नावाच्या विशेष पारंपरिक पद्धतीच्या कपड्यांचे शोरूम लाँच केले आहे. या शोरुमचे अनावरण प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या वेळी संचालक दिनेश जैन, प्रविण जैन आणि विनोद जैन उपस्थीत होते.
पुण्यातील लक्ष्मी रोड, कोथरूड, औंध, कॅम्प, पुणे-सातारा रोड, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर येथील मल्टी-ब्रँड रिटेल स्टोअर द्वारे लोकांच्या पसंतीस उतरलेल्या जयहिंदने वस्त्रे व फॅशन उद्योगातील आपल्या समृद्ध अनुभवावरून पुरुषांसाठी सर्वोत्तम पारंपरिक पोशाख उपलब्ध करून देण्याची गरज ओळखली. याच कल्पनेवर अंमल करत जयहिंदने मेवार मेन्स एथिनीक वेअर स्टोअर या विशेष भारतीय पारंपरिक पोशाखाचे पुण्यातील बाजीराव रोड येथे आणखी एक भव्य मेवार शोरूम लाँच केले.
पुरुषांसाठीच्या पारंपरिक पोशाखांच्या उत्कृष्ट श्रेणीतील शेरवानी, बंधगळा, इंडो-वेस्टर्न, चुडीदार कुर्ता, डिझाइनर सूट, पठाणी,फॅब्रीक, रेडी मेड्स व फेस्टिव्ह स्पेशॅलिटीतील अत्यंत दर्जेदार अलंकार, क्राफ्टवर्क आणि भरतकाम केलेली सर्वोत्तम वस्त्रे शोरूम मध्ये आजच्या आधुनिक काळातील पुरुषांसाठी उपलब्ध होणार आहेत. मेवार मध्ये कस्टमाइड्ज टेलरींग व इनहाऊस डिजाईनर्स उपलब्ध असतील, बाजीराव रोड वरील हे आणखी एक मेवार शोरूम त्याच्या अभ्यागतांसाठी सर्वोत्तम वस्त्रांच्या श्रेणींसोबत आकर्षक ऑफर देखील घेऊन येणार आहे.७ हजार रूपयांच्या खरेदीवर २० टक्यांची फॅल्ट सूट मिळेल.