पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या ७५ वर्षांच्या सुवर्ण काळाची माहिती देणारी शोभायात्रा माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने काढण्यात आली होती.
ढोल-ताशांच्या गजरात आज सकाळी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. संस्थेची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी आणि विविध क्षेत्रात उ‘ेखनिय कामगिरी करणार्या माजी विद्यार्थ्यांची माहिती चित्ररथाद्वारे प्रदर्शित करण्यात आली होती.
मराठी भाषेचे संवर्धन, विविधतेतून एकता, संत साहित्य, गणिताचा इतिहास, बेटी बचाओ, डिजिटल इंडिया, जीएसटी, स्टार्ट अप योजना यांची माहिती देणारे ङ्गलक विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पालकमंत्री गिरीश बापट, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशीष पुराणीक, बाळासाहेब अनास्कर, राजू मराठे, सुधीर गाडगीळ, गौतम बेंगाळे, सुहास धारणे, अरुण निम्हण, युवराज शहा, संजय साबळे, सुरेश केकाणे, किशोर लोहोकरे आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.