पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॅनेजमेंट अकाउन्टटस (आयएमएम) यांच्यात नुकताच शैक्षणिक करार करण्यात आला. त्यानुसार आयएमएच्या ङ्गायनान्स या विषयाचा अभ्यासक‘म बीएमसीसीच्या बी. कॉम अभ्यासक‘मात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बीकॉमची पदवी संपादन करीत असताना विद्यार्थ्यांना ङ्गायनान्स या स्पेशल विषयात आयएमएची सर्टिङ्गाईड मॅनेजमेंट अकाउन्टटस ङ्गायनान्स ही पदवी मिळविता येणार आहे.
बीएमसीसीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ आणि आयएमएचे अध्यक्ष थॉमसन यांनी स्वाक्षर्या केल्या. यावेळी श्री. थॉमसन यांचे भविष्यकाळातील अकाउन्टटसचे व्यवसायातील स्थान या विषयी व्या‘यान झाले. जगात यांत्रिकीकरण झपाट्याने होत असल्याने नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवणे गरजेचे झाले आहे, त्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करा आणि चिकित्सक विचार करून योग्य निर्णय घ्या असे आवाहन श्री. थॉमसन यांनी यावेळी केले. उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक, डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, प्रा. यशोधन महाजन यांनी संयोजन केले.