पुणे – भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्रातील खेळाडूंना पुढे कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा विकासासाठी क्रीडा संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातून आणखी चांगले खेळाडू घडतील. क्रीडा संघटना, शासन आणि खेळाडूंनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील खेळाडूंना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केले.
स्टेट इक्वेस्ट्रियन असोसिएशन आणि दिग्विजय हॉर्स रायडींग अॅकॅडमीच्यावतीने नामदेव शिरगावकर यांचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना देखील सन्मानीत करण्यात आले. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, जगदीश कदम, गुणेश पुरंदरे, विनायक हळबे यावेळी उपस्थित होते.
आशिया कपमध्ये कांस्यपदक पटकाविणारे विराज परदेशी अजिंक्य बालवडकर तसेच श्रेया पुरंदरे, अनिरुद्द मोहिरे, सोहम फडे, सोफिया बैग यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला.
नामदेव शिरगावकर म्हणाले, भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अतिशय अभिमान वाटतो. कोणत्याही स्वप्नाचा ध्यास घेऊन सातत्याने पाठलाग केल्यास यश नक्कीच मिळते. आगामी काळात होणाºया स्पर्धेसाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे. याचा फायदा घेऊन महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करायला हवी आणि जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.