कधी काळी सकाळ व्हायची तुझ्या हाके ने. मग यायचा गरम चहा. एक दिवस असा नाही गेला की माझी सकाळ तुझ्या चेहऱ्या वरच्या हास्याने सुरु नाही झाली.
आयुष्य पुढे सरकले आणि राहिल्या त्या फ़क्त आठवणी आज तुझ्या पासून दूर असल्यावर सुद्धा सकाळ होताच तुझी आठवण येते।
आपण भलेही दूर दूर असू पण तुझ्या आठवणींचा ओलावा तसाच आहे. या खास दिवसा निमित्ताने तुझे आभार मानण्याची ही संधी। प्रत्येक जन्मात तूच माझी आई असावी हीच देवाकडे प्रार्थना!