रंगत सुंदरवाडी महोत्सवाची

February 22nd, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

टिम “येवा कोकणात”

 

सावंतवाडी शहराची नवी ओळख निर्माण करणारा सुंदरवाडी महोत्सव यंदा २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २००१८ रोजी होत आहे. या महोत्सवात प्रसिद्ध सिने तारका, गायक,गायिका, कवणी आणि  कॉमेडीयन यांची धम्माल आणि बरच काही पहायला व अनुभवायला मिळेल अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिली. या महोत्सवाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून सांगता समारंभाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे, सौ. नीलमताई राणे उपस्थित राहणार आहेत. असेही परब यांनी सांगितले.

सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर होणाऱ्या या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार २३ फेब्रुवारीला शुभारंभ प्रसंगी रुपेश चव्हाण मुंबई प्रस्तुत “सप्तसूर तारकांच्या साक्षीने” हा नृत्याविष्काराचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले, केतकी पालव, आघाडीची नृत्यांगना व अभिनेत्री प्रांजळ पालकर यांच्या नृत्याचा अविष्कार या दिवशी अनुभवायला मिळणार आहे. तर यांच्यासह सिनेतारका लावणी साम्राज्ञी प्रियांका जाधव आणि आयटम गर्ल निशा बरोत यांचा खास अविष्कार पहायला मिळणार आहे.

मराठीत विनोदाची रंगभूमी गाजवणारे प्रसिध्द विनोदवीर संदीप गायकवाड, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे यांच्या विनोदी किश्यानी प्रेक्षकांना हास्य मेजवानी अनुभवता येणार आहे.  

शनिवार २४ फेब्रुवारी रोजी रुपेश चव्हाण व ऐश्वर्या पालकर प्रस्तुत ‘रंग मराठी मनाचा’ हा राज्यातील लोककला संस्कृतीवर आधारित कार्यक्रम होईल. सुमारे ७२ कलाकारांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम खास आकर्षण आहे. गौरव पाटील व श्रुती पाटील यांची जुगलबंदी विशेष आकर्षण आहे. त्याशिवाय शुभांगी केदार व रंजेश पटेल यांचीही जबरदस्त पेशकस पहायला मिळणार आहे. तर मराठी बाणा फेम स्वीटी सदाफुले हिच्या लावणीचा ठसकेबाज कार्यक्रम खास मनोरंजनाचत्मक मेजवानी असेल.

महोत्सवाची सांगता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे, सौ. नीलमताई राणे उपस्थितीत राहणार असून रविवार २५ फेब्रुवारीच्या या दिवशी महाराष्ट्राचा बुलंद आवाज गायक आदर्श शिंदे, वैशाली सामंत राहुल सक्सेना यांची मराठी गाण्यांची सुरेल मैफल होणार आहे. एकंदरीत सावंतवाडीकर आणि जिल्हा वाशियांसाठी हि सांस्कृतिक मेजवानी असून त्याचा मोठ्या संखेने उपस्थित राहून सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केळे आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

गतवर्षी या महोत्सवाचे दुसरे वर्ष तेव्हा नारायण राणे य्हे कॉंग्रेस पक्षात होते. या वर्षी तिसरे यशस्वी वर्ष साजरे करत असताना नारायण राणे यांनी स्वताचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष म्हणून राणे काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे आणि तो पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यामागे नारायण राणे यांचे योगदान शब्दांकित करता येण्यासारखे नाही. गतवर्षीच्या महोत्सवात नारायण राणे यांनी समारोप प्रसंगी खालील संदेश दिला होता.

सुंदरवाडीला ३५० वर्षाचा इतिहास आहे. अशी ही सुंदरवाडी आज महोत्सवाच्या निमित्ताने खरोखरच सुंदर दिसत आहे. सुंदर मनाची माणसेही जमली आहेत. कार्यक्रमही अतिशय सुंदर होत आहे. असा इतिहास असलेल्या सुंदरवाडीतील या महोत्सवामुळे सर्वाचे चेहरे फुललेले दिसत आहेत. हिंदुस्थानमध्ये अच्छे दिन यायचे तेव्हा येवोत मात्र सुंदरवाडीला हे तीन दिन चांगले आले आहेत. या महोत्सवाचा आनंद लुटा मात्र यातून प्रबोधन घेऊन पर्यटनातून विकास साधण्यासाठी प्रगतीचा मार्ग चोखाळा. पर्यटन व्यवसाय हा जगामध्ये दुस-या क्रमांकावरील यशस्वी व्यवसाय आहे. जगाच्या पाठीवरील सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, युरोप, अमेरिका अशा अनेक देशांनी पर्यटनाच्या माध्यमातून आपला देश समृद्ध केला. पर्यटनावर आधारित त्यांचे अर्थसंकल्प असतात. एवढे महत्त्व पर्यटनाला आहे. म्हणूनच त्याच धर्तीवर १९९७ साली टाटा कंपनीच्या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा अभ्यास करून हा जिल्हा कोणत्या क्षेत्रातून विकसित होईल व येथील जनतेला सुखी व समृद्ध करता येईल व सुबत्ता आणता येईल हे जाणून घेऊन गोव्यापेक्षाही निसर्गसंपन्न असलेल्या या जिल्हय़ाला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून  घोषित केले. मी मंत्री व मुख्यमंत्री असताना पर्यटनासाठी कंपनी स्थापन केली व त्या कंपनीकडे हा पर्यटनाचा व्यवसाय दिला. सरकारी व खासगी गुंतवणुकीतून या जिल्हय़ात सी वर्ल्ड, विमानतळ, डिस्नेलॅण्ड, रोप-वे, मिनीट्रेन अशा अनेक उपक्रमांचे नियोजन करून ते राबविण्यास सुरुवात केली. त्यातील चिपी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून सी वर्ल्डच्या भूसंपादनाकरिता पालकमंत्री असताना १०० कोटींची तरतूद केली. सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये सुशिक्षितांना नोक-या मिळण्यासाठी ओरोसला आयटी पार्क मंजूर केला. जवळपास ३०० कं पन्या येऊ शकतील यासाठी ७०० एकरमध्ये दोडामार्गमध्ये एमआयडीसी स्थापन केली. हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील त्या वेळी २ लाख नोक-या जिल्हय़ात उपलब्ध होतील. यामुळे जिल्हय़ात बेकारी राहणार नाही आणि नोकरी, व्यवसाय, उद्योग, शेती आणि पर्यटन या माध्यमातून जिल्हय़ाचा सर्वतोपरी विकास साधला जाईल. नवीन सरकारला १०० दिवस झाले. या शंभर दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ाला, कोकणाला काय मिळाले हाच प्रश्न आहे. या सरकारने मी कोकणासाठी आणलेले ८०० कोटींचे प्रकल्प रद्द केले. सरकारकडे पैसे नसल्यामुळे या वर्षीच्या जिल्हय़ाच्या अर्थसंकल्पात ४० टक्के कपात केली. जिल्हय़ातील सर्व क्षेत्रातील विकासकामे आज बंद आहेत. मात्र, असे असतानाही ते १०० दिवस झाले म्हणून सेलिब्रेट करीत आहेत. मी सरकोरवर टीका करायला या महोत्सवाचा उपयोग करणार नाही. पण या महोत्सवातून प्रबोधन व्हावं, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील जनतेच्या विकासाचे विषय त्यांनी आत्मसात करून कार्यान्वित करावेत, असं मला वाटतं. मी येथील जनतेच्या समृद्धीसाठी  आणलेले सी वर्ल्डसारखे विकासात्मक प्रकल्प बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. विमानतळाला विलंब लावला जात आहे. सर्व किनारपट्टीवर जाणारी २३८ कोटींची पाण्याची योजना आज बंद करत आहेत. ज्यांना तुम्ही निवडून दिले ते तुमच्या विकासाच्या आड येत आहेत. असे राणे गतवर्षी बोलले होते.

वर्षपूर्ती आणि राणेंनी स्तापन केलेल्या नव्या पक्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गतवर्षी उपस्थित केलेले प्रश्न काही संपलेले नाहीत. त्या प्रश्नाकडे राणे यावेळी कोणत्या दृष्टीने पाहतात आणि त्यावर पक्षाध्यक्ष म्हणून कसे व्यक्त होतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.  

 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions