पुणे – समाजापासून अलिप्त असणाऱ्या एड्सग्रस्त मुलामुलींसमवेत दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगपंचमीचा आनंद साजरा करताना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सेवा सुरु करून विधायक उपक्रमाचा आदर्श पायंडा अमित बागुल मित्र परिवाराने घालून दिला आहे. सलग आठ वर्षे गुजरनिंबाळकर वाडी -कात्रज येथील ममता फौंडेशनच्या आश्रमाला रंगपंचमीच्या मुहूर्तावर उन्हाळ्यासाठी टँ करसेवेचा शुभारंभ केला जातो.
यंदाही माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस आय कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवारातर्फे आई- वडिलांविना पोरकी झालेली ;पण जन्मदात्यांमुळे एड्ससारख्या दुर्धर आजाराला सामोरी जाणाऱ्या मात्र उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस होत असलेल्या एड्सग्रस्त मुलांसाठी रंगपंचमीच्या निमित्ताने या टँकरसेवेची व्यवस्था केली.
गुजरनिंबाळकर वाडी -कात्रज येथील ममता फौंडेशनच्या आश्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगोत्सव साजरा करण्यात आला. माजी उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल आणि संपूर्ण बागुल कुटुंबीयांनी या मुलांसमवेत रंगपंचमी साजरी केली त्यानंतर स्वादिष्ट भोजनाचा आनंदही सर्वांनी घेतला. यावेळी जोपर्यंत पाणीप्रश्न संपुष्टात येत नाही तोपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देणार आहे तसेच पाण्याची साठवणूक करण्यासाठी दहा ते बारा मोठे पिंप आणि अन्य सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे , अशी माहिती अमित बागुल यांनी दिली. याप्रसंगी इम्तियाज तांबोळी, संतोष पवार, अभिषेक बागुल , गोरख मरळ , योगेश निकाळजे, समीर शिंदे, भरत तेलंग, अशोक शिंदे, उमाकांत गायकवाड , अमर ससाणे,धीरज भोसले, सुयोग धाडवे , निलेश खिरीड , कल्पेश पाटील , महेश ढवळे , सचिन महगडे ,राहुल जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.