पुणे –
इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप आणि वाघोली, पुणे येथील पार्वतीबाई मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय गो-कार्ट’ स्पर्धेत बावधन पुणे येथील पीव्हीपीआयटी महाविद्यालयाने चॅम्पियनशीपचा किताब व रोख 75 हजारांचे पारितोषिक पटकावले. मोशी, प्राधिकरण सेक्टर 6 येथील ट्राफिक थिम पार्क येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील 36अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रासह ओडीसा, राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश येथून एकूण 900 विद्यार्थी सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या हस्ते करण्यात आले. 125 सीसी क्षमतेचे इंजिन वापरून बनवलेल्या गो-कार्ट मध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ब्रेक टेस्ट, स्किड पॅड टेस्ट, ॲटो क्रॉस व इंडोरन्स रेसिंग अशा विविध कौशल्यपूर्ण चाचण्या पूर्ण केल्या. ॲटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप क्लब तर्फे प्रा. प्रतीक सातव, प्रा. मनोज भोजणे, प्रा. गणेश कदम, प्रा. मार्तंड पंडागळे यांनी संयोजनात सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजयी संघ खालीलप्रमाणे : प्रथम क्रमांक (75 हजार रोख व चॅम्पियनशीप ट्रॉफी) : पीव्हीपीआयटी (बावधन,पुणे); व्दितीय क्रमांक (50 हजार रोख) – डीकेटीईएस टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), तृतीय क्रमांक (35 हजार रोख) – जेएससीओई (हडपसर, पुणे); चतुर्थ क्रमांक (20 हजार रोख) – आर्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयपूर राजस्थान); पाचवा क्रमांक ( रोख 12 हजार ) : सीओईपी (पुणे) या संघांना गौरविण्यात आले.
याबरोबरच बेस्ट डिझाईन गटात सीओईपी पुणे यांना प्रथम क्रमांक, तर व्दितीय क्रमांक जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कुरण, पुणे) यांना देण्यात आला. एक्स्लिरेशन गटात प्रथम – आर्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयपूर राजस्थान); व्दितीय – एमएमआयटी, (लोहगाव, पुणे). स्किड पॅड – प्रथम सीओईपी (अवसरी,पुणे); व्दितीय – पीव्हीपीआयटी (बावधन, पुणे); ॲटो क्रॉस – प्रथम क्रमांक एमएमआयटी, (लोहगाव, पुणे); व्दितीय क्रमांक डीकेटीईएस टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी). इनोव्हेशन – प्रथम युपीईएस (डेहराडून) व्दितीय – बीव्हीआरआयटी (नौरपूर हैद्राबाद), ॲस्थिटीक – प्रथम – सिंहगड इन्स्टिट्यूट (लोणावळा,पुणे); व्दितीय – सीओईपी (अवसरी, पुणे). बेस्ट कॅप्टन – प्रथम – मानस जयस्वाल, (युपीईएस, डेहराडून); व्दितीय शुभम गारडे (आरएससीओई, पुणे); बेस्ट ड्रायव्हर – प्रथम – तेजवीर सिंग, व्दितीय – अजिंक्य शिंदे, द्रोणाचार्य ॲवॉर्ड – प्रथम – बी. श्याम बाबू, व्दितीय – शिवलिक दुबे, तृतीय – सुनील तपासे. यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.