MAH: राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला  व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयुक्त आणि महापौरांना निवेदन

March 6th, 2018 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे –
 
पुण्याचे आभूषण आणि रंगभूमीचा आधार असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास पुणे शहर  राष्ट्रवादी काँग्रेस च्या  साहित्य,  कला  व सांस्कृतिक विभागाने विरोध दर्शविला आहे. हे रंगमंदिर पाडू नये याबाबतचे निवेदन आज मंगळवार, दि. 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजता महापालिका आयुक्त कुणाल कुमार, महापौर मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ, श्रीनाथ भिमाले  यांना देण्यात आले. 
 
‘बालगंधर्व रंगमंदिरातील होणारे प्रयोग सांस्कृतिक कार्यक्रम न थांबविता आणि त्यांच्यामध्ये खंड न पाडता त्यापध्दतीचे नियोजन करून बांधकाम करावे. बालगंधर्व रंगमंदिरातील मोकळी जागा आहे या जागेचा नवीन थिएटर उभारताना वापर करावा’, असे मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ म्हणाले.
 
‘पु. ल. देशपांडे यांनी स्वतः उभे राहून बालगंधर्व रंगमंदिराच्या काम पाहिले होते. पु. ल यांच्या कल्पनेतून साकारलेले हे रंगमंदिर पडल्यास तत्कालीन कलाकारांच्या भावनांचा अपमान  होईल. जी. एस. टी. कर प्रणाली आपल्यापासून सामान्य कलाकारांचे जीवनमान अडचणीत आहे. वाटत हे रंगमंदिर पाडून नव्याने बंधने यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी जाणार असून, अनेक नाटकांचे व्यावसायिक प्रयोग बंद होऊन कलाकारांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ येऊ शकते. सद्यस्थितीत असलेले बालगंधर्व रंगमंदिर उत्तम व सुस्थितीत असून त्यामध्ये कामे करणे आवश्यक आहे, असे मत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या  साहित्य,  कला  व सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.  
 
पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासमवेत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदधिकारी मुरलीधर मोहोळ, श्रीनाथ भिमाले यांना भेटले आणि सदरचे निवेदन सादर केले. 
 
यावेळी बाबासाहेब पाटील (पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या  साहित्य,  कला  व सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष), मेलडी मेकर्सचे अशोककुमार  सराफ, अभिनेत्री माधवी मोरे, आरती शिंदे, काव्या शिंदे, ज्योती बोरावके, कल्याणी वाडेकर, अभिनेता योगेश सुपेकर, आशुतोष वाडेकर, विनोद धोकटेकर, संदिप पळीवाले, नितीन मोरे, दिपराज जाधव, एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष राहूल भालेराव, निर्माते माणिकशेठ बजाज, दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर, माया धर्माधिकारी, अनिल गोंदकर, ईकबाल दरबार,अमित कुचेकर, मुकेश देडिया आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी, सिने नाट्य क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
 
’बालगंधर्व रंगमंदिर वस्तू पडणे हा पुणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी करणारा आणि ठेकेदार धार्जिण असणारा निर्णय आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याच्या नव्हे तर राज्याच्या रंगभूमी चळवळीचे स्मृती मंदिर आहे. शहरात प्रत्येक भागात रंगमंदिरे उभी राहिलेली आहेत, आता बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यापेक्षा त्याचे जतन करणे गरजेचे आहे. या रंगमंदिराच्या वास्तूतून दिग्ग्ज कलाकार तयार झाले आहेत. या वास्तूचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. हि वस्तू पडण्याचा घाट घातला जात आहे हि दुर्दैवी बाब आहे. ’ असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions