रायगड (प्रतिनिधी) – कर्जत रेल्वे स्थानकातील उदघोषना विभागाचा कारभार रेल्वे प्रवाशांना दिवसेदिवस अत्यंत तापदायक ठरत असल्यामुळे उदघोषना विभागाच्या बेपर्वाईमुळे कर्जत रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांना जीव धोक्यात टाकुन रेल्वे मार्ग ओलांडुन एका फलाटावरून दुस-या फवाटावर यावे लागत आहे. मुंबई दिशेकडुन खोपोलीला जाणा-या खोपोली लोकलचा फलाट कायमस्वरूपी निश्चित नसल्यामुळे खोपोली लोकल फलाट क्रमांक एक, दोन वा तीनवर आणली जाते. परंतु, अनेकदा फलाट क्रमांक एक वा तीनवर येणा-या खोपोली लोकलचा फलाट गाडी येण्याच्या केवळ एक ते दोन मिनिट अगोदर बदलला जावुन तशी उदघोषना केली जाते. त्यामुळे संपुर्ण फलाटावर गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना अचानक बदललेल्या फलाटामुळे पादचारी पुलावरुन खोपोली लोकल येणा-या फलाटावर जाणे कठीण असल्याने नाईलाजास्तव सर्व प्रवाशी आपला जीव धोक्यात टाकुन कर्जत रेल्वे स्थानकातील रेल्वे मार्ग ओलांडुन एका फलाटावरुन दुस-या फलाटावर जातात. त्याचदरम्यान अनेकदा पुणे दिशेकडुन येणारी व कर्जत स्थानकात न थांबणारी जलद मेल एक्सप्रेस गाडी कर्जत रेल्वे स्थानकातुन मुंबई दिशेकडे जात असते. त्यामुळे भयंकर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दुर्घटना घडुन गेल्यानंतर उपाययोजना करण्यास प्रशासन नक्कीच प्रयत्न करेलच. परंतु, दुर्घटना होण्याआधीच रेल्वे प्रशासनाने उदघोषना विभागाचा कारभार सुधारावा व कर्जत रेल्वे स्थानकातील रेल्वे मार्गांच्या मधोमध लोखंडी कुंपन घालुन होणारी रेल्वे क्रासिंग कायमस्वरूपी बंद करावी. तसेच, जर खोपोली गाडीचा फलाट अचानकपणे बदलला गेल्यास गाडी कर्जत रेल्वे स्थानकात आल्यानंतर सर्व प्रवाशी फलाटावर येवुन गाडीत चढेपर्यंत गाडी थांबवुन ठेवावी. गाडी कर्जत फलाटावर दोन मिनिट थांबवली तरी चालेल पण, एखाद दोन मिनिटांकरता कुणाचा नाहक मृत्यु व्हावयास नको याची काळजी घेतली जावी अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.
कर्जत रेल्वे स्थानकातील उदघोषना विभागाचा भोंगळ कारभार, कर्मचारी बदलण्याची असोसिएशनची मागणी
Team TNV March 7th, 2018 Posted In: येवा कोकणात
Team TNV