पुणे –
भारतीय किसान संघाचे शहराध्यक्ष ऍड. बाबासाहेब चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
बुधवारी (२१ मार्च) सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. बाबासाहेब चव्हाण अमृत महोत्सवी गौरव समितीचे अध्यक्ष ऍड. दादासाहेब बेंद्रे यांनी ही माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.
चंद्रकांत भगवंत तथा बाबा चव्हाण लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक असून, अविवाहित राहून संघ कार्य केले आहे. ते व्यवसायाने वकील आहेत. १९७५ मध्ये आणीबाणीत भूमिगत राहून काम केले. गरजूंसाठी दवाखाना, अभ्यासिका, संस्कार वर्ग असे कार्य केले आहे.
पतित पावन संघटनेच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. असंख्य कार्यकर्त्यांना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा असून सामाजिक समरसता आणि वस्ती विभागात संघाचे कार्य वाढविण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.