पुणे – सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या वतीने जागतिक वन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे प्रांगणात पथनाटयाद्वारे वृक्षसंवर्धन, वृक्ष लागवड तसेच वन्य प्राणी व पशुपक्षी यांचे संरक्षण, विषयक महत्व या पथनाटयाद्वारे माहिती दिली व प्रभोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत येत्या पावसाळयात 13 कोटी वृक्ष लागवडीचा धडक उपक्रमाची माहिती दिली व सर्व उपस्थितांना 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करुन शासनामार्फत सुरु केलेल्या हरित सेना (Green Army) विषयी माहिती सांगून प्रत्येकाने www.greenarmy.mahaforest.gov.in या लिंकवर आपल्या नावाची नोंद करून सदस्य होण्यासाठी आवाहन केले. तसेच वन्य प्राण्यांचे रक्षण व पक्षी संवर्धनाचे महत्व या पथनाटयाद्वारे पटवून देण्यात आले. हा कार्यक्रम सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या वतीने शाहीर श्री. एडगे सोलापूर, आणि त्यांचे सहकारी यांनी सादर केला. यावेळी विविध खात्यातील उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फुर्त दाद दिली.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सालविठ्ठल, भालेराव तसेच सहायक वनसंरक्षक निकम व कांबळे, व वनक्षेत्रपाल गौरी बोराडे व वनक्षेत्र सर्वेक्षक रसाळ, तसेच सामाजिक वनीकरणाचे माहिती व प्रसिध्दी अधिकारी के. बी. वेदपाठक, व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.