पुणे
– बालवाडी विद्यार्थी बौद्धीक विकास उपक्रम अंतर्गत बौध्दीक खेळणी वाटप
बालवाडी व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बौद्धीक व शारिरीक क्षमतेत वाढ होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला बाल कल्याण विकास समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच सर्व बालवाडीमध्ये विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याअंतर्गत बालवाड्यांना बौध्दीक खेळणी वाटप पिंपरी-चिंचवड महापालिका महिला बाल कल्याण सभापती सुनिता तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.
सोमवारी (दि. 26 मार्च) रहाटणी कन्या, मुले, शाळा क्र. 55 येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविताताई खुळे, निर्मला कुटे, बालवाडीच्या मुख्य समन्वयक संजिवनी मुळे, अरुणा शिंदे, मुख्याध्यापिका रेहाना अत्तार, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, शुभम नखाते, शाम राजवाडे, श्रीराम कुटे, नरेश खुळे, विलास काटे आदी उपस्थित होते.
सुनिता तापकीर पुढे म्हणाल्या की, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व बालवाड्यांना बौध्दीक खेळणी व साहित्य वाटण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दीक, मानसिक, शारीरिक व सामाजिक क्षमतेत वाढ होणार आहे. महापालिकेच्या 206 बालवाडीतील 7200 पैक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमा अंतर्गत यापुर्वीच सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता किट वाटप करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीन वाटप सुरु करण्यात आले आहे. हे उपक्रम महाराष्ट्रात सर्व प्रथम पिंपरी चिंचवड मनपा राबवित आहे. तसेच, या शिक्षकांचे मानधन वाढीबाबतचा प्रश्न महापालिका लवकरच सोडवेल असा विश्वास तापकीर यांनी व्यक्त केला.
नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थींनीनी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. स्वागत मुख्याध्यापिका रेहाना अत्तार, सुत्रसंचालन गणेश लिंगडे, आभार संजिवनी मुळे यांनी मानले.