पुणे
राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : सुरक्षेप्रती केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर शालेय स्तरापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वत्र जागरूकता वाढविण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियाना’प्रमाणे ‘राष्ट्रीयसुरक्षा जनजागृती अभियान ‘ राबविणे गरजेचे आहे असे मत भारत फोर्ज लि. कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक डॉ. एस.व्ही.भावे यांनी व्यक्त केले. ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेलमॅनेजमेंट (एनआयपीएम), आरुष फायर सिस्टम्स व एस एम ई चेंबर ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, औद्योगिक आस्थापनांमध्ये खूप मोठ्या आकाराची यंत्र सामुग्री असते अशावेळी एखादी छोटीशी चूकदेखील जीवावर बेतू शकते. म्हणूनच सर्वांनी सावधगिरीने कामकरावे यासाठी ‘सुरक्षा संस्कृती’ रुजू करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.
याप्रसंगी विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.सन्मानचिन्ह, मानपत्र असे यापुरस्काराचे स्वरूप होते. पर्यावरण सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा व अग्नी सुरक्षा अशा तीन प्रकारात पुरस्कार विभागून देण्यात आले.
या पुरस्करार्थींमध्ये फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लि. चे सुरक्षा अधिकारी नंदू लोखंडे, कल्याणी कारपेंटर स्पेशल स्टील लि.चे सुरक्षा अधिकारी आत्माराम पाटील, हिंदुस्तान कोका कोला कंपनीचे ई.एच. एस. व्यवस्थापक अनिल बडगुजर, कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी फारुख डुंगे, गोदरेज प्रॉपर्टीज लि.चे सुरक्षा अधिकारी संतोष जगतापआणि के. रहेजा प्रॉपर्टीजचे सुरक्षा अधिकारी राहुल पवार या सहा जणांचा समावेश होता.
यावेळी बोलताना आरुष फायर सिस्टम्सचे संचालक राहुल जाधव यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये सुरक्षेचे महत्व वाढविण्यासाठी जमेल तितका प्रयत्नकरावा. याप्रसंगी त्यांनी विविध अग्नि सुरक्षा उपकरणांची माहिती चित्रफितीद्वारे स्पष्ट केली. तसेच यावेळी उद्यम प्रकाशनच्या ‘धातुकाम’ मासिकाचे संपादक दीपक देवधर, गेस्टॅम्प ऑटोमोटिव्हचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी रुपेश कदम, आरुष फायर सिस्टम्सचे संस्थापक अर्जुन जाधव यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटूयट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या विद्यार्थ्यानी ‘सुरक्षेचे महत्व’ ही नाट्यछटा सादर केली.
या कार्यक्रमाला पुणे, पिंपरी चिंचवड तसेच राज्यातील विविध भागातून आलेल्या औद्योगिक कंपन्यांचे सुरक्षा अधिकारी, मनुष्यबळ व्यवस्थापक तसेच आयआयएमएसचे संचालक डॉ. मिलिंद मराठे वइतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन पवन शर्मा यांनी केले. तर सूत्रसंचालन बच्चू पांडे यांनी केले.