पुणे
गोयल गंगा फौंडेशनतर्फे महिलांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन
महिला दिन खरेतर एक दिवसाचा नसून तो वर्षभर साजरा केला पाहिजे, ज्या माध्यमातून महिला शक्ती व महिलांचा सन्मान सातत्याने घडवून आणणे आवश्यक आहे. ‘गृहिणी’ घरात पूर्णवेळ राबत असते. मुलांचे संगोपन, घरातील व्यवहार, मुलांवर संस्कार अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते. त्यामुळेच‘गृहिणी’असणे हा नोकरीपेक्षाही उच्च सन्मान आहे.असे मत गोयल गंगा फौंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल यांनी व्यक्त केले.
स्त्रियांच्या कर्तृत्वाला प्रेमाची आणि कौतुकाची थाप मिळणं अत्यंत गरजेच असतं यासाठीच मार्केटयार्ड येथील गंगाधाम टॉवर्स येथे महिलांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
गोयल गंगा फौंडेशनच्या विश्वस्त अतुल गोयल, अमृता गोयल, दीपा अमित कुमार,प्रमुख पाहुण्या इंटिरीयर डिझायनर अमला शेठ आणि लीना सलडान्हा याप्रसंगी उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांसाठी नृत्य, गायन अशा वेगवेगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.
प्रमुख पाहुण्या अमला शेठ आपल्या ध्येयासाठीचे नियोजन हे लहान वयापासूनच महत्वाचे आहे त्यातूनच तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे याची जाणीव होते. जा महिलांनी स्वतःमधील क्षमतांचा अधिकाधिक विकास साधल्यास त्यांना कोणत्याही क्षेत्रात यश आपोआपच मिळते. आपण काय शिकलो यापेक्षा किती ज्ञान मिळवले याकडे तुमचा कल असू द्या. असे मत त्यांनी असे मत त्यांनी यावेळी महिलांशी संवाद साधताना व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या कि, कोणताही व्यक्ती जसा परिपूर्ण नाही तसा कमजोरही नाही. हे लक्षात घेऊन आपण आपल्यातील कमतरता दूर करुन परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करू शकतो.