पुणे:
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी २०१८-१९ या वर्षाकरीता शिरीष मोहिते यांची निवड झाली. तर कार्यकारी विश्वस्तपदी बी.एम.गायकवाड, खजिनदार अॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, उप उत्सवप्रमुख उल्हास कदम यांची नियुक्ती झाली आहे.
यासोबतच अॅड.एन.डी.पाटील, अंकुश काकडे, युवराज गाडवे, नंदकुमार सुतार हे विश्वस्तपदी असणार आहेत. ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष शिरीष मोहिते हे शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे प्रमुख आणि रामराज्य सहकारी बँकेचे संचालक आहेत. तसेच अनेक संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तर, ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बी.एम.गायकवाड हे शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत होते. सध्या ते निवृत्त असून विविध संस्थांतून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
नवनियुक्त अध्यक्ष शिरीष मोहिते म्हणाले, मंदिर स्थापनेस यंदा १२१ वर्षे होत असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. याशिवाय संपूर्ण वर्षात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.