पुणे –
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ऍण्ड रीसर्चचा (आयएमडीआर) ४३ वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक महेश आठवले, आयएमडीआरचे संचालक दीपक रॉय यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापौर टिळक म्हणाल्या, ‘जीवनाच्या विविध क्षेत्रात यश मिळविण्यासाठी व्यवस्थापनाची गरज असते. विकसित शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी योग्य व्यवस्थापन महत्वाचे असते. स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्याने आदी क्षेत्रात विद्यार्थ्यांची व्यवस्थापन कौशल्ये, नावीन्यपूर्ण कल्पना उपयुक्त ठरतात.’
संस्थेच्या १२० विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात आल्या. हर्षल गौरी सुवर्ण पदकाचा आणि वैदेही खत्री रौप्य पदकाची मानकरी ठरली. दीपक रॉय यांनी प्रास्ताविक केेले, डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी स्वागत केले, प्राजक्ता प्रधान यांनी सूत्रसंचालन केले, महेश आठवले यांनी आभार मानले.