पुणे –
पुणे जिल्ह्याचा सन 2018 या वार्षाचा 56 हजार कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला असून या पत आराखड्याचे प्रकाशन दि. 2 एप्रिल 2018 रोजी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक व पुणे जिल्हा परीषदाचे प्रभारी अतिरिक्त सी ई ओ दिनेश डोके यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र परीमंडल पूर्व क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजय मणियार, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी रोषन महाजन, जिल्हा उद्योग केंद्र सरव्यवस्थापक काशिनाथ डेकाटे, जिल्हा अग्रणी बँकव्यवस्थापक आनंद बेडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उप सरव्यवस्थापक इंगळे, सहाय्यक सरव्यवस्थापक श्री.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पत आराखड्याची वैशिष्ट्ये सांगताना दिनेश डोके म्हणाले, हा पत आराखाडा 56 हजार 154 कोटीरुपयांचा असून मागील वर्षापेक्षा तो 15 टक्क्यांनी अधिक आहे. प्राथमिकता क्षेत्रासाठी 31 हजार 101 कोटी रुपयांचीतरतूद करण्यात आली असून ती एकून पतपुरवठ्याच्या 62 टक्के आहे. कृषी कर्जासाठी 7394 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी 21 टक्के एवढे आहे. कृषी कर्जामध्ये प्रामुख्यानेसेंद्रिय शेती, फ़ुले व फ़ळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रीकीकरण, राष्ट्रीय फ़लोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारीबँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामिण बँकेसह 41 बँकांच्या 1615 शाखांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी दिनांक 31 जानेवारी 2018 अखेर पीक कर्जासाठी 2441 कोटी रुपयांचे वाटप करूनउदिष्टाच्या 65 टक्क्यांनी पुर्ती केलेली आहे. पतपुरवठा आराखड्यात लघुउद्योजकांसाठी 13 हजार 106 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्वयंरोजगार योजनांसाठी, शैक्षणिक कर्जासाठी, गृहकर्जासाठी, छोट्याव्यवसायासाठी 14 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गत वर्षाच्या पत पुरवठा आराखड्यापेक्षा या सन 2018-19 आराखड्या मध्ये लघु उद्योजकां करिता 37 टक्के, इतर प्राथमिकता क्षेत्रा करिता 42 टक्केएकूण प्राथमिकता क्षेत्रा करिता 38टक्के, अप्राथमिकता क्षेत्रा करिता 15 टक्के, एकूण पत पुरवठा आरखड्याच्या 15 टक्के वृद्दी करण्यात आली आहे.