पुणे
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने खासदार वंदना चव्हाण यांची राज्यसभेसाठी खासदार पदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
पक्षाच्या वतीने वंदना चव्हाण यांच्या शपथविधी नंतर हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी दादासाहेब सांगळे , हरिभाऊ थोरात, माऊली जाधव, राजेश शहा, वैभव जाधव, संजय गाडे, योगेश वराडे, किरण रानडे, उषा घोगडे , विकास पागे, अविनाश वेल्हाळ उपस्थित होते.
खा. वंदना चव्हाण यांनी गेल्या आपल्या कार्यकाळात संसदेत विविध विषयांवर अभ्यासपुर्ण भाषणांमुळे मोहर उमटवली आहे. राज्याच्या प्रश्नांसोबत पर्यावरणाच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात व्यापक भूमिका मांडली, प्रामुख्याने लहान मुले, महिलांचे प्रश्न राज्यसभेत मांडून त्याचा पाठपुरावा केला होता.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या परिषदांमध्ये वंदना चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. बहुतांशी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
संसदीय कार्यकाळात दिला जाणारा खासदार निधी वंदना चव्हाण यांनी विधायक व व्यापक कामांसाठी देत आदर्शवत पायदंडा पाडला तसेच संसद आदर्श योजने अंतर्गत दत्तक घेतलेल्या सुंदुबरे गावाचा कायापालट करून स्थानिक नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मोलाची भरच घातली. त्यामुळे वंदना चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेसाठी वंदना चव्हाण यांची निवड केली.