मानाचा अरविंदन् पुरस्कार प्राप्त केलेला ‘रेडू’ हा मालवणी बोलीतील चित्रपट राज्य पुरस्कारांमध्येही चमकला आहे. सर्वोत्कृष्ट रंगभूषेच्या घोषित पुरस्कारासह ‘रेडू’ला एकूण ९मी नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळे ‘रेडू’ सध्या जोरात वाजत असून तो १८ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांनीही काम केले आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिककार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाऱया राज्य चित्रपट पुरस्कारांची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली. यात रेडूच्या श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा पुरस्कार जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी शशांक शेंडे आणि छाया कदम, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी गुरू ठाकुर, सर्वोत्कृष्ट संगीत, पार्श्वसंगीतासाठी विजय नारायण गवंडे, सर्वोत्कृष्ट गायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट कथा-पटकथेसाठी संजय नवगिरे यांना नामांकन मिळालं आहे. सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांमध्येही रेडूची निवड झाली आहे.
यापूर्वी कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंटरनॅशनल कॉम्पिटीशन विभागात रेडूची निवड झाली होती. या विभागात निवड झालेला रेडू हा एकमेव भारतीय चित्रपट होता. कोलकाता महोत्सवात इंडियन कॉम्पिटीशन विभागासाठी रेडूची निवड झाली होती. त्या स्पर्धेत रेडू हा एकमेव मराठी चित्रपट होता. तसेच इफ्फीसारख्या महत्वाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागातही निवड झाली होती. केरळच्या चलत्चित्र अकादमीतर्फे दिग्दर्शक सागर वंजारी यांना पदार्पणाच्या चित्रपटासाठी मानाच्या अरविंदन पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.
मालवणीतील ‘रेडू’ चित्रपट जोरात
Team TNV April 11th, 2018 Posted In: येवा कोकणात
Team TNV