पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम-2013 कायद्यांतर्गत स्थानिक तक्रार निवारण समितीस सक्षम करण्यासाठी पुणे विभागीय स्तरावर शासकीय कर्मचाऱ्यांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा अल्पबचत भवन सभागृह, पुणे येथे मंगळवार 22 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 10-30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच या दिवशी दुपारी 3 वाजता जनसुनावणी ठेवली आहे,यात पीडित महिला थेट तक्रार दाखल करू शकतात.
या कार्यशाळेमध्ये पुणे जिल्ह्यात जिल्हास्तरीय शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या तसेच प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीस त्यांची जवाबदारी,कर्तव्ये आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम-2013 मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी, या विषयी समिती सदस्यांना या समस्येची कारणे व स्वरूप याविषयी संवेदनशील बनविणे,या कायद्याच्या तरतुदीबाबत मार्गदर्शन केलं जाईल.
तसेच सदस्यांची सकारात्मकता वाढविणे, समिती सदस्य म्हणून जवाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्य व जवाबदारीची माहिती देणे,दाखल प्रकरणांच्या चौकशीची कार्यपध्दती, प्रक्रिया स्वरुप आणि व्याप्ती, स्थानिक व अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्यांची भूमिका, जबाबदारी आणि आवश्यक कौशल्य यावर माहिती देण्यात येणार आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, पुणे विभाग प्रशांत शिर्के यांनी केले आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी 22 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन
Team TNV August 18th, 2017 Posted In: Pune Express
Team TNV