खवळे महागणपती तारामुंबरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम
द न्यूट्रल व्ह्यु चा मराठी अंक “येवा कोकणात” आता आपल्या सेवेत दाखल झाले असून. ३० ऑगष्ट २०१७ या अंकाचे खवळे महागणपती तारामुंबरी तालुका देवगड येथे सकाळी ११ वाजता प्रकाशन होत आहे. कोकणातील किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरील संपूर्ण कोकण ठळकपणे आपल्यासमोर मांडतानाच कोकणचे वेगळेपण आपल्यासमोर आणण्याचा आमचा ठळक उद्देश राहील.
आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर या कोकणच्या सुपुत्राने मराठी पत्रकारिता श्रुष्टीला मूर्त स्वरूप दिले. पुढे मराठी पत्रकारितेचे क्षेत्र वाढले, तिची अनेकांनी जोपासना केली. आज मराठी पत्रकारितेचे क्षेत्र जग व्यापत आहे. अनेक न्युज चॅनल, दैनिके, नियतकालिके, मासिके, पाक्षिके वाचकांना समृद्ध करत आहेत. द न्यूट्रल व्ह्यु हे पाक्षिक सुरवातीला गोवा येथून इंग्रजी भाषेत सुरु झाले. वाचकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. गोवा हे स्वतंत्र राज्य असले तरी तो कोकणचाच एक अविभाज्य घटक आहे. गोवा वगळून उर्वरित कोकण प्रांत हा प्रामुख्याने मराठी वाचकांचा आहे. या मराठी वाचकांना सामावून घेणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे असे आम्ही समजतो. आणि म्हणूनच येवा कोकणात हे नाव घेऊन आम्ही कोकणी वाचकांच्या सेवेत दाखल होत आहोत.
येत्या बुधवार दिनांक ३० ऑगष्ट २०१७ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खवळे महागणपती तारामुंबरी तालुका देवगड येथे सकाळी ११ वाजता या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. खास गणपती विशेषांक असलेल्या या अंकात गणरायाच्या विविधा माहितीचा खजानाच आहे. कोकणच्या मातीचा गंध असलेले हे पहिले तटस्थ विचाराचे पाक्षिक आपल्याला नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे.