केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आणि सिक्कीम चे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.
सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरणारी बालशिवाजी असलेले सन्मानचिन्ह,एक लाख रुपये ,शाल ,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाला निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर ,पालकमंत्री गिरीश बापट ,महापौर मुक्ता टिळक ,देवीसिंग शेखावत ,डॉ शां . ब . मुजुमदार ,प्रतापराव पवार ,चंदू बोर्डे ,सुधीर गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते
वसंत प्रसादे ,मधुकर ताम्हस्कर ,निरबहादूर गुरुंग ,रामदास मोरे ,अनिल लामखेडे ,श्रीनिवास आचार्य या स्वातंत्र्य सैनिक ,गोवामुक्ती सैनिक आणि सैन्यदलात सेवा करताना जखमी झालेल्या सैनिकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला .
डॉ सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले . ‘पुण्यभूषण पुरस्कारापासून प्रेरणा घेऊन सर्वत्र पुरस्कार सुरु झाले ,आता नव्या पिढीने या पुरस्काराची जबाबदारी स्वीकारावी ‘असे मनोगत त्यांनी व्यक्त केले . महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत केले .
‘डॉ संचेती याना पुण्यभूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे महत्व वाढले आहे . विद्वान व्यक्तींनी दुसऱ्या विद्वान व्यक्तींचा सन्मान पुण्यात करणे ही दुर्मिळ गोष्ट असली तरी पुण्यभूषण फाउंडेशन ने २९ वर्षे हा उपक्रम उत्तमरीत्या चालविला आहे . ज्या गावात आपण कार्यरत असतो ,त्या गावाने दिलेला पुरस्कार महत्वाचा असतो ,डॉ संचेती यांचे कार्यही पुरस्काराच्या तोलामोलाचे आहे . चांगला डॉक्टर असण्याबरोबर ते समाजातील चांगली व्यक्तीही आहेत . इथूनपुढेही त्यांच्या हातून रुग्णसेवा घडो ‘ असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले .
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले ,’डॉ संचेती यांनी रुग्णसेवेचे चांगले काम हसऱ्या चेहऱ्याने केले ,त्यामुळे रुग्णांना उपचाराआधीच दिलासा मिळत असतो . त्यामुळेच देशभरातून त्यांच्याकडे रुग्ण येतात आणि परदेशातही ते मार्गदर्शन करतात .
इंडस या पहिल्या भारतीय कृत्रिम सांध्याचा उल्लेख करून डॉ माशेलकर म्हणाले डॉ संचेती ही व्यक्ती नसून एक संस्थाच आहे
सत्काराला उत्तर देताना डॉ संचेती म्हणाले ,’पुणेकरांनी मला भरपूर प्रेम दिले . घरून मिळालेले कामाचे बाळकडू ,मित्रप्रेम आणि पत्नीची साथ यामुळे मला यश मिळाले . आईच्या धाडसी स्वभावाला समोर ठेवून मी अध्ययन सुरु असतानाच हॉस्पिटल सुरु केले . ज्ञान आणि सेवा ही वैद्यकीय जीवनात महत्वाची असते ,यापुढेही मी उर्वरित आयुष्यात पुणेकरांची आणि रुग्णांची सेवा करणार आहे .
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले ,’ पुण्यभूषण चे सर्व २९ पुरस्कार सोहळे पाहिलेला मी आहे . आज माझ्या उपस्थितीत डॉ संचेती यांचा गौरव होत आहे ,ही आनंदाची बाब आहे . माणसे जोडणारी ,हाडे जोडणारी आणि मने जोडणारी माणसे आज या व्यासपीठावर एकत्र आली ,याचा आनंद उत्तम मैफलीसारखा आहे ‘
सुरेश धर्मावत (काका ) यांनी आभार मानले . योगेश देशपांडे यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले