तारामुंबरी येथील खवळे महागणपती समोर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन….
राजकारणात काम करणाऱ्या नेत्यांचे कान गणपतीसारखे असले तरच त्याना सामान्य जणांचे गाऱ्हाणे ऐकायला जाईल, आज समाजात असलेल्या समस्या समजून घेणारे नेते कमी आहेत किंबहुना त्यावर सडेतोड लिहिण्याची गरज आहे आणि ती गरज द न्युट्रल व्ह्यु या पाक्षिकाच मराठी अंक “येवा कोकणात” नक्कीच पूर्ण करेल, शिवाय आपल्या नावातूनच घर वापशिचा संदेश घेऊन निघालेले हे पाक्षिक लवकरच कोकणचे अग्रणी दैनिक म्हणून वाचकांच्या सेवेत येईल याची मला खात्री वाटते असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले
देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथे खवळे महागणपती या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गणपती समोर द न्युट्रल व्ह्यु या पाक्षिकाच मराठी अंक “येवा कोकणात” चे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी माजी आमदार प्रमोद जठार बोलत होते, यावेळी खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुर्यकांत खवळे, द न्युट्रल व्ह्यु प्रायवेट लिमिटेडचे संचालक उत्तम कुमार, संचालिका प्रिया सलगोत्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश सामंत,माजी पंचायत समिती सदस्य संतोष किंजवडेकर, कवी व गीतलेखक चंद्रशेखर तेली, कृषी विभागाचे अधिकारी शिवराज खरात, या मान्यवरांसह येवा कोकणात चे निवासी संपादक विवेक ताम्हणकर, विनया वालावलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद जठार पुढे म्हणाले आज कोकणातला मोठा वर्ग नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई आणि पुणे येथे राहतो. याला कारण कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसणे हे आहे. कोकणी माणसाला पुन्हा त्याच्या घरी परत आणायचे असेल तर येथे रोजगार निर्माण करायची गरज आहे फक्त रोजगारच नाही तर त्याबद्दल कोकणी माणसाच्या मनात सकारात्मक भावनाही निर्माण केली पाहिजे, द न्युट्रल व्ह्यु या पाक्षिकाने आपला मराठी अंक आणताना त्याचे ठेवलेले “येवा कोकणात” हे नाव आम्ही प्रयत्न करत असलेल्या घरवापसिच्या धोरणाला सकारात्मक बळ देणार आहे. आणि हीच सकारात्मकता “येवा कोकणात” या पाक्षिकाला कोकणी माणसाच्या मनात मोठे स्थान मिळून देईल असा मला विश्वास वाटतो असे मट त्यांनी मांडले.
द न्युट्रल व्ह्यु प्रायवेट लिमिटेडचे संचालक उत्तम कुमार यावेळी म्हणाले कि कोकणातला माणूस हा नेहमीच चांगला विचार करतो “येवा कोकणात” या पाक्षिकातही कोकणी माणसाचच प्रतिबिंब असेल. इथल्या चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणतानाच चर्चात्मक संवाद या पाक्षिकातून साधण्याचा आमचा मानस आहे. आम्ही येथे आलो हे कधीही परत जाण्यासाठी नाही असा विश्वास व्यक्त केला. घर वापसिच्या मुद्यावरही अत्यंत भावनिक भाष्य केल. द न्युट्रल व्ह्यु च्या माध्यमातून गोव्यातही आम्ही हाच प्रयत्न करत आहोत. येवा कोकणात हे नावही त्यासाठीच निवडल असून कोकणी माणसाने पुन्हा कोकणात येऊन कोकणला समृद्ध करावे हा आमचा उद्देश आहे असे मत मांडताना कोकणी माणसाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी रहावेत असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुर्यकांत खवळे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच खवळे परिवार सदैव “येवा कोकणात” च्या पाठीशी असेल असा आश्वासक विश्वास त्यांनी व्यक्त केला.