वीजबिल ऑनलाईन भरण्यासाठी अनेक ठिकाणी पथनाट्यांद्वारे जागर

September 1st, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – महावितरणचे वीजबिल ग्राहकांनी ऑनलाईनद्वारे भरण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीआयटी) विद्यार्थ्यांचा पथनाट्यांद्वारे जागर सुरु आहे. गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी या पथनाट्यांचे प्रयोग होत आहेत.

महावितरणने वीजबिल ऑनलाईनद्वारे भरण्यासाठी वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. पुणे परिमंडलात सद्यस्थितीत 6 लाख 60 हजार वीजग्राहक दरमहा 145 कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा करीत आहेत. ही संख्या आणखी वाढविण्यासाठी महावितरणकडून ऑनलाईन वीजबिल भरणा प्रोत्साहन उपक्रम सुरु आहे. यामध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीआयटी) विद्यार्थ्यांनीही योगदान देत स्वयंस्फूर्तीने पथनाट्य बसविले असून त्याद्वारे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी ऑनलाईन वीजबिल भरण्याचा जागर सुरु केला आहे. या पथनाट्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच आणखी 20 विद्यार्थी विविध सोसायट्यांमध्ये जाऊन मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजबिल भरण्याचे वीजग्राहकांना प्रात्यक्षिक देत आहेत.

रास्तापेठ येथे गुरुवारी (दि. 31) महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या पथनाट्याद्वारे व्हीआयटीच्या विद्यार्थ्यांनी मने जिंकून घेतली. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता सर्वश्री सुंदर लटपटे, महेंद्ग दिवाकर, विजय भटकर आदींची उपस्थिती होती. व्हीआयटीचे प्रा. राजेश ढाके यांच्या मार्गदर्शनात शिवम वळसकर, समृद्धी माने, आकाश नाईकवाडे, धनश्री अघोर, तन्वी गायकवाड, सारंग पाम्पटवार, गायत्री विठोलीकर, अभिषेक चौथमल, प्रियांशू घोंगे, शार्दुल राजहंस, गायत्री साळोखे, रेवती शहाणे, प्राची महाजन, प्रतिक खर्डे यांनी पथनाट्य सादर केले. गणेशोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी हे पथनाट्य सादर होणार आहे. महावितरणकडून लेखा अधिकारी श्री. विकास निकम यांनी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. पथनाट्याच्या आयोजनासाठी सहाय्यक महाव्यवस्थापक (लेखा व वित्त) सौ. माधुरी राऊत, कार्यकारी अभियंता श्री. किशोर गोर्डे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, श्री. भरत अभंग यांनी सहकार्य केले.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions