ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना

September 14th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

मुंबई – 31 मार्च 2017 पूर्वी कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती  कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली असून यात ग्राहकाला मूळथकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रक्कमे वरील व्याज  विलंब आकार 100% माफ करण्यात येणार आहे. महावितरणच्या ज्या घरगुती  कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा 31 मार्च 2017 पूर्वी कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे. अशा ग्राहकांसाठी ही नवीन योजना असून योजनेतसहभागी होणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकीत रक्कमेची पाच हप्त्यात विभागणी करण्यात येणार आहे. त्यापैकी मूळ थकीत रकमेचा पहिला हप्ता  वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी रक्कमभरल्यानंतर ग्राहकाचा वीज पुरवठा सुरु करण्यात येईल. उर्वरित मूळ थकबाकीच्या 4 हप्त्यांचा भरणा संबंधित ग्राहकाने मासिक वीज बिल सोबत भरणे आवश्यक आहे. ग्राहकांनी थकीतरकमेचा पूर्ण भरणा निर्धारित पा हप्त्यात पूर्ण केला तरच संबंधित ग्राहकाला थकीत रक्कमेवर व्याज  विलंब आकारात 100% माफी मिळणार आहे.

कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या कृषी  घरगुती ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी हावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनमहावितरणने केले आहे.

Recent News

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions