गौरी लंकेश आणि न्यायाधीशाच्या भूमिकेतले आपण..

September 17th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

नितीन साळुंखे ९३२१८११०९१

पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनानरून उभ्या देशात दोन गट पडले आहेत. एक गट खुनाचं समर्थन छुपं करतो आहे, तर दुसरा गट तेवढ्याच टोकाचा निषेध करून पहिल्या गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो आहे. खुन, मग तो कुणाचाही असो, तो निषेधाहर्यचं असतो. कुणाच्याच खुनाचं समर्थन करता येत नाही. गौरी लंकेश यांच्या खुनाचं समर्थन वा निषेध करणाऱ्यांना गौरी लंकेश व त्यांच्या विचारांबद्दल किती माहिती आहे, हे कळण्यास काही मार्ग नाही. किंबहूना ती असण्याची शक्यता अगदी कमी आहे. सोशल मिडीयावर तर एक बोलतो म्हणून दुसरा बोलतो असच सर्व चाललय. सोशल मिडीया काय किंवा टिव्हीसारखं इलेक्ट्राॅनिक मिडीया काय, ह्यांची सहज उपलब्धता झाल्याने, जो तो तज्ञ वा न्यायाधिश बनून या खुनावर किंवा कोणत्याही घटनेवर आपापले फैसले सुनावताना दिसत आहे. मिडिया या विषयावर तर न बोलणंच (खरं तर न पाहाणं) जास्त चांगलं. ‘ब्रेकींग न्युज’ला, खरं म्हणजे, ‘बार्किंग न्युज’ हे नांव जास्त समर्पक आहे असं मला वाटू लागलंय. एकच बातमी, मग ती कितीही मोठी वा किरकोळ असो, भूंकल्यासारखी सतत आपली नयनी-कानी-कपाळी मारत असतात. अस भुंकताना, नागड्यांवर भुंकणारा कुत्रा स्वतः नागडा असतो, हेच हे मिडियावाले विसरतात. आपापली मतं मांडताना ती पक्षपाती नाहीत याची काहीच खात्री देता येत नाही. कुणी जर म्हणत असेल, की त्याचं मतं अगदी नि:पक्षपाती आहेत, तर ते खोटं असतं असं खुशाल समजावं. कारण आपण आपली म्हणून जी मतं मांडतो, त्यांवर, आपली स्वत:ची जी पूर्वापार समजूत असते, त्या समजूतींचा प्रभाव आपल्या मतांवर अपरिहार्यपणे पडलेलाच असतो. असं असेल तर ते मत नि:पक्षपाती आहे असं खचितच म्हणता येत नाही. उदा. हिंदुत्ववादी लोक गौरी लंकेश यांच्या खुनाचं समाज माध्यमांवर छुपं/उघड समर्थन करताना दिसतात तर अ-हिंदुत्ववादी लोक, गौरी लंकेशांचा जो काही पूर्वेतिहास किंवा त्यांची मतं विसरून, खुनाचा निषेध करताना हिंदुत्ववाद्यांना न्यायाधिशाच्या भुमिकेतून सरळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना दिसतात. म्हणजे समर्थन किंवा निषेध करताना आपापल्या पूर्वग्रहानुसार आणि आपल्या मतांच्या सोयीने केलं जातं असंच चित्र दिसतं. ह्यांतील अभ्यास कितींचा असतो हा संशोधनाच विषय असतो. ‘पेड न्युज’ च्या जमान्यात सर्वच पत्रकार तरी समतोल विचार करून आपापल्या दैनिकात बातमी वा लेखाची मांडणी करतात, हे आपण छातीवर हात ठेवून सांगू शकतो का? पत्रकार आणि मिडीयाच्या लोकांची मतंच पेपर/टिव्हीच्या माध्यमातून वाचक/प्रेक्षकांच्यावर लादली जातात, हे आपण रोज अनुभवतो. पत्रकारांनी तरी स्वत:ची मतं बाजूला ठेवून बातमी किंवा माहिती द्यावी अशी अपेक्षा असते. या अपेक्षेला किती पत्रकार खरे उतरतात याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा. ‘गोबेल्स निती’ सरकारच नव्हे, तर विरोधी पक्ष किंवा अगदी आपणही रोजच्या रोज राबवत नसतो का? आपलीच मतं कशी बरोबर आणि दुसऱ्याची चुकीची हे आपणही प्रंसगोनुरुप वेळोवेळी लोकांना सांगत असतोच की..!गौरी लंकेश यांच्याविषयी मलाही फारशी माहिती नाही. किंबहूना माझं नियमित पेपर वाचन असूनही हे नांव माझ्या नजरेखालून कधीही गेलं नव्हतं, हे मी पहिल्यांदाच सांगून टाकतो. तरी देखील गेल्या दोन दिवसांत गौरी लंकेशांसंबंधात ज्या काही बातम्या वा माहिती मी समाज माध्यमं किंवा इंटरनेटवरून घेतली, त्यावरून गौरी लंकेश नक्षलवादी चळवळींशी संबंधीत होत्या असा निश्कर्ष काढावा लागतो. गौरी लंकेशांच्या बंधूंची काल एक बाईट इंडीया टिव्हीवर पाहिली. त्यात त्यांनी गौरी लंकेशांचा खुन नक्षलवाद्यांच्या आपापसातल्या भांडणातून झाला असण्याची शक्यता वर्तवली. गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत असणारे नक्षलवादी आणि शहरांत त्यांचे असलेले उच्चभ्रू आणि उच्च शिक्षित समर्थक यांच्यामधली दरी वाढत असल्याच्याही बातम्या मला वाचायला मिळाल्या. गौरी लंकेंशांच्या खुनामागे ही शक्यता आहे का हे ही तपासून पाहायला हवं. दुसरं म्हणजे जेएनयूमध्ये कन्हैयाकुमार प्रकरणात ‘भारत तेरे टुकडे होंगे’ या घोषणा देणारा उमर खालीद आणि स्वत: कन्हैया कुमार यांचं मातृत्व गौरी लंकेश  यांनी जाहिररित्या स्विकारलं होतं. भारताचे तुकडे करायची इच्छा असणाऱ्यांना गौरी लंकेश जाहिररित्या समर्थन देतात, ह्या घटनेचा कुणीच निषेध केल्याचं वा या घटनेवर टिव्हीवर वांझोट्या चर्चा झाल्याचं ऐकिवात किंवा पाहाण्यात नाही. दिवंगत व्यक्तीबद्दल चांगलं बोलावं, वाईट बोलू नये या आपल्या संकेताचा इथेही सोयीनेच वापर केला जातोय असंच म्हणावं लागतंय. कन्हैया कुमार आणि उमर खालिद ही दोन्ही नांवं साम्यवादी विचारसरणींशी संबंधीत आहेत असं माझं मत आहे. तसंच नक्षलवादी आणि/किंवा साम्यवादी विचारसरणी देशभक्त म्हणून कधीही प्रसिद्ध नव्हती/नाही. कम्युनिझमचा जन्म रशियातला. म्हणून इतर देशातले साम्यवादी ‘देशभक्ती’ म्हणजे रशियाशी निष्ठा ठेवणं असं समजतात की काय असंच मला वाटत.गौरी लंकेश नक्षलवादी किंवा/आणि साम्यवादी चळवळीशी संबंधीत होत्या हे आता स्पष्ट आहे. ह्या दोन्ही विचारसरणी हिन्दुत्ववादी किंवा/आणि राष्ट्रवादी विचारसरणीशी थेट विरोधी विचारसरणी आहेत. म्हणून गौरी लंकेश किंवा तत्सम विचारांच्या व्यक्तींचे होणाऱ्या खुनात, हिन्दुत्ववादी /राष्ट्रवादी विचारांच्या लोकांना थेट आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणं कितपत योग्य आहे हे माझ्या लक्षात येत नाही. काँग्रेस उपाध्यक्ष श्रीमान राहूल गांधींनी तर तसा थेट आरोपच जाहिररित्या केलेला आहे. आपल्याशी न पटणाराच आपला खुन करु शकतो ही शक्यता जास्तीची असली, तरी तोच आपला खुन करतो, हा विचारच मुळात चुकीचा आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या सोबत असणाऱ्यानाच आपलं वाईट करण्याची संधी विरोधकापेक्षा जास्त असते ही शक्यताच आपण कोणी गृहीत धरत नाही. इथं मला जगप्रसिद्ध गुप्तहेर शेरलॉक होम्सचं एक वाक्य आठवतं. होम्स म्हणतो, “जे होणारच नाही असं आपण समजतो, तेच होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते”. गौरी लंकेंशांच्या खुनासंदर्भात विरोधी विचाराच्या लोकांना आरोपीच्या पिजऱ्यात उभं करणाऱ्यांनी हे ही लक्षात घ्यायला हवं. गौरी लंकेश असोत किवा केरळात पडत असलेले संघ स्वयंस्वकांचे खुन असोत, त्यांचं समर्थन करताच येणार नाही. पण असे खुन का केले जातात वा पाडले जातात यावर समर्पक आणि समतोल विचार करणं गरजेचं आहे. न्यायाधिशांच्या भुमिकेत शिरण्याची गरज नाही. सामाजिक जगात कर्यरत असलेल्या व्यक्तींच्या खुनांच्यामागे प्रत्येकवेळी राजकारणंच असतं हा विचारही योग्य नाही असं मला वाटतं.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions