पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे सरकारकृत महागाई विरोधात आंदोलन 

September 18th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे  – भाजपा सरकारच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपती मंदिर येथील कार्यालयासमोर चूल मांडून कार्यकर्त्यांनी निषेध केला.
या वेळी भाजपा शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  ‘या महागाई चे करायचे काय सामान्य जनतेने खायचे काय ?’, ‘महागाई ने जनता पेटली, अच्छे दिनची हौस फिटली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दरवाढ विरोधी घोषणा देत सायकल रॅली काढली.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली चाकणकर, अशोक राठी, राकेश कामठे, रवींद्र माळवदकर, भोलासिंग अरोरा, शशिकला कुंभार, उर्मिला गायकवाड, रत्नप्रभा जगताप, वैशाली बनकर, मीना पवार, अनिस सुंडके, बाळासाहेब बोडके, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या , ‘ सरकारने निवडणुकीपूर्वी महागाईविरोधी आवाज उठविला होता. भाजपा सरकार सत्तेत आल्यावर जनतेला वाटले होते कि महागाई कमी होईल, परंतु दिवसेंदिवस भाव वाढ वाढतच चालली आहे. पेट्रोल, गॅस, भाजी अशा दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर वाढत आहेत. क्रूडऑइल चे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाले होते. अशा परिस्थितीत पेट्रोल, डिझेल चे दर कमी होणे अपेक्षित होते परंतु दर वाढतच आहेत. सामान्य जनतेवर सरकार अन्याय करत आहेत. वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून अच्छे दिन हेच का ? असेच भाव सणासुदीच्या तोंडावर वाढत गेले तर जनता काय खाणार यासाठी आम्ही हे महागाई विरोधात आंदोलन केले आहे.’
रुपाली चाकणकर म्हणाल्या ‘पालक मंत्री आपले धोरण नीट राबवत नाहीत, ऐन सणासुदीच्या काळात गॅस , भाजी, कडधान्ये अशा प्रकारच्या दैनंदिन वापरातील वस्तू ची दरवाढ करून सरकारने जनतेची पिळवणूक केली आहे. वारंवार या बाबतचे निवेदन देऊनही काही फरक न पडल्याने आम्ही ज्वारीची भाकरी आणि मिरची चा आहेर पालक मंत्र्यांना देत आहोत कारण या भाव वाढीमुळे  सामान्य जनतेला कदाचित हेच खावे लागणार आहे.’

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions