पुणे – ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट (VEDA), अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट’ च्या वतीने अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार 2017-18 चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात शिल्पा रानडे (अॅनिमेशन क्षेत्र, मुंबई), काशिनाथ साळवे (फाईन आर्ट, मुंबई), प्रोसेनजीत गांगुली (अॅनिमेशन, कलकत्ता), वसंत सोनावणे (फाईन आर्ट, मुंबई) या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम आझम कॅम्पसमध्ये पार पडला. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष होते.
डॉ. मनोहर जाधव (मराठी विषय विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. यावेळी एम.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, सचिव लतिफ मगदूम, प्रा.इरफान शेख, कॉलेजचे प्राचार्य ऋषी आचार्य उपस्थित होते. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार’ हा भारतातील सर्व महाविद्यालयातील अॅनिमेशन, कला, ललित कला आदी क्षेत्रातील शिक्षकांना विलक्षण योगदान आणि उत्तुंग कामगिरीसाठी देण्यात येतो. दरवर्षी चार पुरस्कार कला क्षेत्र, ग्राफीक डिझाईन, अॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, स्पेशल ईफेक्ट्स, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, पेंटींग क्राफ्ट, शिल्पकला, ललित कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील कलाकार आणि शिक्षकांना देण्यात येतात.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमातंर्गत पुणे विद्यापीठ परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रेया भगत (बी.एस.सी अॅनिमेशन, प्रथम वर्ष), गणेश चौधरी (बी.एस.सी अॅनिमेशन, द्वितीय वर्ष), मिताली दांडे (बी.एस.सी अॅनिमेशन), पूनम नगरकर (जीडी, आर्टस्), श्रद्धा गायकवाड (एटीडी, आर्टस्), सूरज होनावकर (फाऊंडेशन ऑफ आर्टस्) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.