पुणे – मॉडेलिंग, इमेज मॅनेजमेंट, पोषण आणि तंदुरुस्ती हे ध्येय असलेल्या “शाईन ऑन” हा उद्यम चालविणाऱ्या फ्रीलांस मॉडेल आणि अभिनेत्री ईशा अगरवाल यांनी‘माईलस्टोन मिस ग्लोबल वर्ल्ड इंटरनॅशनल पॅजन्ट’ हे शीर्षक हा पटकाविला आहे. मॉस्को, रशिया येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत ‘मिस सुपर मॉडेल’ होण्याचा मान देखील ईशाला मिळाला.
मॉस्को येथे झालेल्या माईलस्टोन मिस अँड मिसेस ग्लोबल वर्ल्ड इंटरनॅशनल पॅजन्ट 30 देशातील 37 राष्ट्रीय विजेत्यांनी सहभाग घेतला होता. भारत, साऊथ आफ्रिका, युक्रेन, जॉर्जिया, पोलंड, जर्मनी, इस्राईल, युएसए, हाँग-काँग, व्हिएतनाम, फ्रांस, पेरू, रशिया व अन्य देशातील महिलांनी या पॅजन्ट मध्ये सहभाग घेतला होता. सेंट पीटर्सबर्ग व मॉस्को येथे स्पर्धकांना 10 दिवस विविध कार्य, उपक्रम व खडतर सत्रांमधून जावे लागले. ईशा अगरवालने भारताचे प्रतिनिधित्व केले व क्राउन जिंकून भारताची मान उंचावली
जवळपास 200 दर्शक व रशिया आणि इतर देखातील अधिकारी मॉस्को मध्ये झालेल्या अंतिम फेरी साठी उपस्थित होते. जूरी पॅनेलमध्ये देखील मिस युनिव्हर्स ओल्गा टॉर्नर, मिसेस युनाइटेड नेशन्स डॉ प्रीती सोलंकी, मिसेस अर्थ रशिया नदालिया यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न व्यक्तींचा समावेश होता. या वर्षी झालेले पॅजन्ट महिला सशक्तीकरण या थीम वर आधारित होते.
बाल्टिमोर, युएसए यथे ईशाने ‘फर्स्ट रनर अप मिस इंटरनॅशनल एक्सक्युजिट 2015’ हा शीर्षक पटकाविला. ह्या वर्षी थायलंड येथे झालेल्या पॅजन्ट शो मध्ये ईशाने “माईलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल प्रिन्सेस 2017 हा शीर्षक जिंकला.
या भव्य यशाबद्दल बोलताना ईशा म्हणाली की, “या आधी मी बाल्टिमोर येथे फर्स्ट रनर्स अप टायटल व थायलंड मध्ये माईलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल प्रिन्सेस 2017 हे शीर्षक जिंकले आहे पण आंतरराष्ट्रीय पॅजन्ट शो जिंकण्याची संधी कधीच मिळाली नाही. हे स्वप्न आता पूर्ण झाल्याबद्दल मी अत्यंत आनंदित आहे व माझ्या पालकांच्या, मित्रांच्या आणि शुभ चिंतकांच्या प्रेम आणि समर्थनाशिवाय हे शक्य झाले नसते”.
ईशा पुढे म्हणाली की, “आज मी जे काही आहे त्याचे श्रेय परमेश्वराला जाते आणि माझा त्या सर्वोच्च शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळेच माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली. मी आनंदित आहे की हे टायटल जिंकून मी दाखवून दिले आहे की भारतीय लोक कुठेच मागे पडत नाहीत. महत्वकांक्षी मॉडेल्स साठी मला आदर्श मॉडेल बनायचे आहे व त्यांना हे सांगायचंय की मेहनतिच्या जोरावर सर्व काही शक्य आहे. हे विश्व तुमचे मंच आहे”.
मॉडेलिंग पुरते मर्यादित न राहता ईशा या महिन्यात रिलीज होणाऱ्या ‘तिथीवासल’ या तमिळ सिनेमात ईशा झळकणार आहे. ऑक्टोबर मध्ये रिलीज होणाऱ्या ‘निवे’ या तेलुगू सिनेमामध्ये देखील ती दिसणार आहे. मॉडेलिंग प्लॅटफॉर्मने निश्चितच ईशासाठी अनेक मार्ग मोकळे केले आहेत व या क्षेत्रात पुढे अजून प्रगतीकरून ती आपले स्वप्न पूर्ण करायची इच्छा बाळगते.
या भव्य यशानंतरही ईशाचे पाय अजूनही जमिनिवर आहेत. मतिमंद मुलांना वेळ देत त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी ती कामयानी स्कूल सोबत कार्यरत आहे.