पुणे – बंगाली समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘पूर्बो पूना सर्बजनीन दुर्गोत्सव 2017 चे आयोजन 25 सप्टेंबरपासून हडपसरच्या भोसले गार्डन येथे करण्यात आले आहे.
पारंपरिक बंगाली पद्धतीचा दुर्गोत्सव आणि धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे या 6 दिवसीय उत्सवाचे स्वरूप आहे. 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान हा उत्सव होणार आहे, अशी माहिती आयोजक संस्था ‘पूना बांगो सन्मिलनी’ आणि ‘पूर्बो पूना कालिबारी समिती’ च्या वतीने ‘दुर्गोत्सव समिती’चे अध्यक्ष सुबीर बिस्वास, सचिव अभिजित डे आणि खजिनदार सौरभ बसाक यांनी दिली. या उत्सवाचे हे 15 वे वर्ष आहे.
दुर्गामातेच्या भव्य प्रतिमेचे 25 सप्टेंबर रोजी भोसले गार्डन मैदानातील मांडवात पूजन करण्यात येणार आहे. कुमारी पूजा, संधी पूजा, सिंदूर दान, भोग प्रसाद, पुष्पांजली असे पारंपरिक बंगाली कार्यक्रम या उत्सवात होणार आहेत.