पुणे –
छायाचित्रासह मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम 209 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये 3 ऑक्टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत होणार असून मोहिमेदरम्यान सर्व पदनिर्देशित ठिकाणी, मतदार मदत केंद्र (VHC) व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, पुणे, ए-बराक, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे दावे व हरकती द्यावे. हरकती नमुना 6, 6अ, 7, 8, व 8अ कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येणार आहेत.
यामध्ये सामान्य अधिवास असणाऱ्या मतदारांनी नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना 6, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरीकांनी नमुना 6 अ, वगळणी व आक्षेप यासाठी नमुना 7, तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना 8, याच मतदारसंघामध्ये एका मतदार यादीभागातून दुसऱ्या मतदार यादीभागामध्ये स्थलांतरीत झालेल्यांसाठी नमुना 8 अ चे अर्ज भरुन देता येतील. रविवार दि. 8 ऑक्टोबर व रविवार दि. 22 ऑक्टोबर या दिवशी विशेष मोहिम राबविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय एजंट (BLA) सकाळी 10 ते सायं 5 या वेळेमध्ये हजर राहून अर्ज व हरकती स्विकारणार आहेत. मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2017 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार असून त्यामध्ये नावाची नोंद असल्याची व्यक्तिश: खात्री करावी तसेच मतदार यादीत नाव असलेखेरीज मतदानाचा हक्क बजावता येत नाही, याची नोंद घ्यावी.
हे अर्ज http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील भरता येणार आहे. सर्व राजकिय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले मतदान केंद्रस्तरीय एजंट(BLA) नमुद विशेष मोहिमेदिवशी हजर ठेवणे सदर मोहिमेमध्ये आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी डी बॅरॅक मध्यवर्ती इमारत, पुणे येथील आर.डी महामूनी मो.क्र. 9421911531 व दिपक वाघमारे मो.क्र. 9881144949 यांच्याशी तर गर्व्हमेंट पॉलिटेक्नीक कॉलेज, गणेश खिंड रोड येथील श्री. रासगे मो. क्र 9420179150 व श्री. कापसे मो क्र. 9011362078 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.