पुणे – द सेंटर फॉर एज्युकेशन ऍण्ड रीसर्च इन जीओसायन्स सीईआरजी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय भूशास्त्र सप्ताहानिमित्त ९ ते १४ ऑक्टोबर ‘जिओविक – 2017’ अंतर्गत विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहानिमित्त आयोजित ‘भूशास्त्र सर्वांसाठी’ हे प्रदर्शन आणि विविध कार्यक‘मांचे उद्घाटन सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सोमवार (9 ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेदहा वाजता घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, डॉ. आर. शंकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना भूशास्त्राची सोप्या भाषेत माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक‘म आयोजित करण्यात आले आहेत. व्या‘याने, परिसंवाद, प्रदर्शन, कला व निबंध स्पर्धा, कार्यशाळा, ङ्गिल्म शो आदी कार्यक‘मांचा समावेश आहे.
भूशास्त्र सर्वांसाठी हे प्रदर्शन 9 व 10 ऑक्टोबर रोजी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. 11 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत फर्ग्युसनच्या एम्फी थिएटर मध्ये या विषयांवरील फिल्म दाखविण्यात येणार आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयाचे के. व्ही. केळकर भूगर्भशास्त्र विभाग १४ ऑक्टोबर रोजी सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता एम्फी थिएटर मध्ये समारोप समारंभ होणार आहे.