पुणे – महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळावा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कविता व्दिवेदी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळावा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राला जनरल चॅम्पियनशीपही मिळाली आहे. याबद्दल विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी घनशा:म रघुनाथ बल्लाळ सहय्यक पोलीस निरीक्षक सोलापूर ग्रामीण सुवर्णपदक (सायंटीफिक इन्व्हिस्टीगेशन फॉरेन्सिक सायन्स लेखी), संतोष सखाराम शिंदे- सुवर्णपदक (पोलीस पोर्टेट), रजत पदक (पोलीस ऑब्जरवेशन), अतुल प्रकाश जाधव-सुवर्णपदक (पोलीस ऑब्जरवेशन), प्रशांत वसंतराव मांडके- घातपात विरोधी पथक- सुवर्णपदक (व्हिआयपी लॉन सर्च), मच्छिंद्र हणमंता बर्डे- रजत पदक(व्हिआयपी रूम सर्च), प्रशांत वसंतराव मांडके-सुवर्णपदक (व्हिआयपी रूम सर्च), पोलीस फोटोग्राफी जयवंत नरसिंग साधू – सुवर्णपदक(फिंगरप्रिंट विभाग), निलेश सरगर (विनर्स ट्रॉफी), श्वानपथक स्पर्धा-डॉग स्कॉड रमेश किसन माने, राहूल गणपत जाखणे – रजत पदक या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.