पुणे – जयहिंदने पुण्यातील कॅम्प येथे मेवार शोरूम या त्यांच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विशेष पारंपरिक पद्धतीच्या कपड्यांचे शोरूम लाँच केले आहे. या शोरुमचे अनावरण पुण्याच्या महापौर आदरणीय मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या वेळी संचालक दिनेश जैन, प्रविन जैन आणि विनोद जैन उपस्थीत होते.
पुण्यातील लक्ष्मी रोड, कोथरूड, औंध, कॅम्प, पुणे-सातारा रोड, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर येथील मल्टी-ब्रँड रिटेल स्टोअर द्वारे लोकांच्या पसंतीस उतरलेल्या जयहिंदने वस्त्रे व फॅशन उद्योगातील आपल्या समृद्ध अनुभवावरून पुरुषांसाठी सर्वोत्तम पारंपरिक पोशाख उपलब्ध करून देण्याची गरज ओळखली. याच कल्पनेवर अंमल करत जयहिंदने मेवार या विशेष भारतीय पारंपरिक पोशाखाचे पुण्यातील कॅम्प येथे भव्य मेवार शोरूम लाँच केले.
पुरुषांसाठीच्या पारंपरिक पोशाखांच्या उत्कृष्ट श्रेणीतील शेरवानी, बंधगला, इंडो-वेस्टर्न, चुडीदार कुर्ता, डिझाइनर सूट, पठाणी,फॅब्रीक रेडी मेड्स व फेस्टिव्ह स्पेशॅलिटीतील अत्यंत दर्जेदार अलंकार, क्राफ्टवर्क आणि भरतकाम केलेले सर्वोत्तम वस्त्रे शोरूम मध्ये आजच्या आधुनिक काळातील पुरुषांसाठी उपलब्ध होणार आहेत. कॅम्प मधील न्यूक्लियस मॉल मधील मेवार त्याच्या अभ्यागतांसाठी सर्वोत्तम वस्त्रांच्या श्रेणींसोबत आकर्षक ऑफर देखील घेऊन येणार आहे.